सहकाराच्या राजकारणात राष्ट्रवादीला धक्का; तीन दिवसात दोन बॅंका निसटल्या : दिग्गज नेते असतानाही पराभवाचा सामना

NCP News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Eknath Khadse, Ajit Pawar News
Eknath Khadse, Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

District Bank Election : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का बसला आहे. अवध्या तीन दिवसात राष्ट्रवादीच्या हातातून दोन जिल्हा बॅंक निसटल्या आहेत. अहमदनगरमध्ये घडलेल्या घडामोडीचा महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीने कोणताच धडा घेतला नाही. त्यानंतर आज झालेल्या जळगाव जिल्हा बॅंक निवडणुकीतही राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला.

जळगाव जिल्हा बॅंकेत माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा धक्का बसला. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संजय पवार हे एका मताने निवडून आले. त्यांना शिवसेनेचे शिंदे गट, ठाकरे गट आणि भाजपचे समर्थन मिळाल्याचे सांगितले जात आहे. अहमदनगरनंतर जळगावातही बहुमत हाती असूनही राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला.

Eknath Khadse, Ajit Pawar News
Jalgaon : भाजपची धूर्त खेळी; शिंदे गटाचा डाव अन् खडसेंना धक्का : जिल्हा बॅंकेची समीकरण रात्रीत बदलली

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात रवींद्र पाटील यांना अध्यक्षपदाची उमेदवार जाहीर करण्यात आली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवारही निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. उपाध्यक्षपदासाठी शिंदे गटाकडून अमोल चिमणराव पाटील यांना संधी देण्यात आली.

राष्ट्रवादीत उमेदवारीवरून एकमत न झाल्याने निवडणूक घेण्यात आली. त्यात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांना १० मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संजय पवार यांना ११ मते मिळाली. पाटील यांची उमेदवारी खडसे यांनी जाहीर केली होती, त्यामुळे खडसेंना मोठा धक्का मानला जात आहे.

Eknath Khadse, Ajit Pawar News
Jalgaon District Bank : संजय पवारांनी डाव टाकला, आघाडीला थांगपत्ताच नाही : मतदान झाल्यावरच बिंग फुटले

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच झालेल्या अहमदनगर जिल्हा बॅंकेत भाजपचे (BJP) माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले. त्यांचाही अवघ्या एका मताने विजय झाला. महाविकास आघाडीकडे बहूनत असतानाही त्यांची मते फुटली. बॅंकेच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बैठक घेतली होती. तसेच काँग्रेसचे ज्येष्ट नेते बाळासाहेब थोरात हेही बैठकीसाठी उपस्थित होते. तरीही आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, दोन बॅंका हातातून गेल्याने सहकाराच्या राजकारणात राष्ट्रवादीला हादरा बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com