Nitish Kumar-Chirag Paswan Meet : फक्त विधासभेसाठी जागा वाटपावर चर्चा, की आणखी एक नवीन राजकीय स्क्रिप्ट?

Bihar Vidhan Sabha Election 2025 Politics Update : जाणून घ्या, नितीश कुमार अन् चिराग पासवान यांच्या खास भेटीमागील राजकीय अर्थ
 LJP leader Chirag Paswan meets Bihar CM Nitish Kumar fueling speculation about seat-sharing talks and possible shifts in Bihar’s political landscape.
LJP leader Chirag Paswan meets Bihar CM Nitish Kumar fueling speculation about seat-sharing talks and possible shifts in Bihar’s political landscape. sarkarnama
Published on
Updated on

Nitish Kumar and Chirag Paswan's Strategic Meeting : बिहारच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीयमंत्री चिराग पासवान यांच्यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. कारण, चिराग पासवान कधी बिहारमध्ये राजकारण करण्याबाबत बोलून राजकीय वातावरण तापवतात तर कधी पाटणामध्ये चिराग पासवान यांना मुख्यमंत्री बनवले जावे, असे पोस्टर्स झळकल्याने राजकीय गोंधळ उडतो.

तेच आता चिराग पासवान यांनी आज(सोमवार) मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गाठले. यानंतर पुन्हा एकदा बिहारच्या राजकीय वर्तुळात चिराग पासवान यांच्यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चिराग पासवान यांच्या झालेल्या विशेष भेटीदरम्यान जागा वाटपापासून ते एनडीएला जास्तीत जास्त जागा कशी मिळतील, यावर चर्चा झाली. मात्र आजची ही भेट केवळ एवढ्यापुरतीच मर्यादित आहे, की  या भेटीमागे काही वेगळे राजकीय समीकरणं दडलेली आहेत? हा उत्सुकतेचा विषय असू शकतो.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. पाटण्याती प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांमध्ये पक्ष कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी केली जात आहे. ज्यावर लिहिले जात आहे की, चिराग पासवान यांच्या स्वागतासाठी तयार आहे बिहार. या पोस्टरची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या जोरदार सुरू आहे. तर दुसरीकडे चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री निताश कुमार यांची भेट घेतली. ज्यात जागा वाटप आणि राजकीय रणनीती निश्चित करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे चिराग पासवान यांच्या पक्षाला त्यांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त जाग मिळण्याची शक्यता आहे.

 LJP leader Chirag Paswan meets Bihar CM Nitish Kumar fueling speculation about seat-sharing talks and possible shifts in Bihar’s political landscape.
Chandrashekhar Bawankule : ''महाविकास आघाडीच्या नेत्यांनी किमान शरद पवारांचा तरी मान राखावा'' ; बावनकुळेंचा टोला!

२०२०मध्ये वेगळे मार्ग, २०२५ मध्ये हम साथ-साथ है -

तसं तर चिराग पासवान आणि नितीश कुमार यांचं नातं कधी सहकारी तर कधी विरोधक आहेत. २०२०च्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्या जदयूविरोधात वेगळा मार्ग निवडला होता. ज्यामुळे जदयूला अनेक जागांवर फटका बसला होता.

 LJP leader Chirag Paswan meets Bihar CM Nitish Kumar fueling speculation about seat-sharing talks and possible shifts in Bihar’s political landscape.
Operation Sindoor : पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी जायला युसूफ पठाणचा नकार; तीन शब्दात सांगितलं कारण

मात्र त्यानंतर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी एनडीए आघाडीत एकजुट दाखवली. चिराग पासवान यांच्य पक्षाने हाजीपूर सह पाच जागांवर विजय मिळवला, ज्यामध्ये नितीश कुमार यांच्या प्रचाराचेही योगदान होते. तर त्यानंतर वर्षभरात असे अनेक प्रसंग आले जेव्हा चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांची भेट घेतली, आता अशावेळी या दोघांमधील वाढती जवळीक काहीतरी वेगळंच राजकीय समीकरण निर्माण करण्याची शक्यताही निर्माण करत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com