India Alliance controversy : पी. चिंदबरम यांच्या वक्तव्याने इंडिया आघाडीला हादरा; अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत केली कोंडी?

P Chidambaram statement News : या वर्ष अखेरीस बिहार राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरु असतानाच पी. चिंदबरम यांच्या वक्तव्याने इंडिया आघाडीला हादरा बसला आहे.
P. Chidambaram
P. ChidambaramSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा झालेल्या पराभवानंतर इंडिया आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसते. त्यातच घटक पक्षाचे परस्पर विरोधी वक्तव्य नेहमीच अडचणीत आणणारे ठरत आहे. या वर्ष अखेरीस बिहार राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरु असतानाच पी. चिंदबरम यांच्या वक्तव्याने इंडिया आघाडीला मोठा हादरा बसला आहे. त्यांच्या या वक्तव्याने आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. दुसरीकडे या विधानांनंतर सत्ताधारी पक्षाला आघाडीवर टीका करण्यासाठी आयते कोलीत मिळाले आहे.

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते पी. चिंदबरम यांच्या राजकीय वादंग निर्माण करणाऱ्या विधानाने राजकारण चांगलेच पेटले आहे. चिदंबरम यांच्या वक्तव्यामुळे 'इंडिया' आघाडीच्या एकसंधतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 15 मे 2025 रोजी दिल्लीतील 'Contesting Democratic Deficit' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना, त्यांनी आघाडीच्या सद्यस्थितीबाबत साशंकता व्यक्त केली आहे. त्यामुळेच आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

P. Chidambaram
Maratha reservation : मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अवघ्या 24 तासांतच अंमलबजावणी

यावेळी चिदंबरम (P. Chidambaram) यांनी इंडिया आघाडी अजूनही एकसंध आहे का, हे मी निश्चितपणे सांगू शकत नाही. ती कमकुवत मिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. दुसरीकडे चिदंबरम यांनी भाजपची प्रशंसा करत वाद अंगावर ओढवून घेतला आहे. भाजप ही एक अत्यंत संघटित आणि बलाढ्य यंत्रणा आहे. ती केवळ राजकीय पक्ष नाही, तर एक शक्तिशाली संघटन आहे, असे नमूद करीत भाजपचे कौतुक केले आहे.

P. Chidambaram
Maratha Reservation : पदभार हाती घेताच सरन्यायाधीश गवई यांनी मराठा आरक्षणासंदर्भात दिले आदेश; नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय द्या

चिदंबरम यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, "काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे विरोधक भविष्यात एकत्र राहणार नाहीत, भाजप एक बलाढ्य संघटना आहे. राहुल गांधींचे निकटवर्तीय सहकारीही काँग्रेसचे भवितव्य नाही, हे ओळखतात,' असे म्हणत टीका केली आहे.

P. Chidambaram
Sapkal meets Thackeray : मायदेशी परतताच सपकाळ मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला; शरद पवार, राज ठाकरेंविरोधातील बॅकप्लॅन ठरला!

चिदंबरम यांनी आघाडीच्या भविष्यासंदर्भात चिंता व्यक्त केली असली, तरी त्यांनी हेही नमूद केले की, आघाडी अजूनही एकत्र येऊ शकते. अजून वेळ आहे. त्यामुळे या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, 'इंडिया' आघाडीतील पक्षांनी एकत्र येऊन, आगामी निवडणुकांसाठी ठोस रणनीती आखणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने इंडिया आघाडीत संभ्रम अवस्था आहे.

P. Chidambaram
Neelam Gorhe On Supriya Sule : नीलम गोऱ्हेंची 'NCP' एकत्र येण्यावर सुळेंना सूचक 'मेसेज'; 'स्थानिक'मध्ये महायुतीचा निर्णय एकनाथ शिंदे घेणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com