Maratha reservation : मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अवघ्या 24 तासांतच अंमलबजावणी

Maratha reservation update News : सुप्रीम कोर्टाचे नवनियुक्त सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी दिलेल्या आदेशानंतर 24 तासांतच मराठा आरक्षण संदर्भातील याचिकांवरील सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे.
Supreme Court- Maratha Reservation News
Supreme Court- Maratha Reservation News Sarkarnama
Published on
Updated on

Supreme Court Maratha reservation News : राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन व आमरण उपोषण केले. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून राज्यातील वातावरण चँगलेच टपले आहे. त्यातच आता मराठा आरक्षणावर मोठी अपडेट येत आहे.

सुप्रीम कोर्टाचे नवनियुक्त सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी दिलेल्या आदेशानंतर 24 तासांतच मराठा आरक्षण संदर्भातील याचिकांवरील सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्देश दिल्यानंतर नव्याने विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आल्याने येत्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश पदाचा पदभार गुरुवारी हाती घेताच सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आदेश दिले होते. त्यांनी मराठा आरक्षण संदर्भात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय देण्याचे आदेश दिले होते.

सरन्यायाधीश गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबाबत आदेश दिल्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) याचिकांवरील सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन केले आहे. अवघ्या 24 तासातच आदेशाची अंमलबाजवणी करीत याबाबतची नोटीस उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.

Supreme Court- Maratha Reservation News
Neelam Gorhe On Supriya Sule : नीलम गोऱ्हेंची 'NCP' एकत्र येण्यावर सुळेंना सूचक 'मेसेज'; 'स्थानिक'मध्ये महायुतीचा निर्णय एकनाथ शिंदे घेणार

राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीसाठी न्या. रवींद्र घुगे, न्या. संदीप मारणे, न्या. निजामुद्दीन जमादार यांचे विशेष पूर्णपीठ स्थापन करण्यात आले आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबाबत आदेश दिल्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी खंडपीठाची स्थापना केली आहे. खंडपीठाची स्थापना करण्यात आल्याने येत्या काळात लवकरच सुनावणीला सुरुवात होणार असल्याने हा मुद्दा लवकरच निकाली लागण्याची शक्यता असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Supreme Court- Maratha Reservation News
Chhagan Bhujbal Politics: कर्नल सोफियांचा अपमान करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा का नाही? भुजबळांनी भाजपला खिंडीत गाठले

या बाबतची नोटीस सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोटिशीत या प्रकरणाची सुनावणी कधी सुरु होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, येत्या काळात लवकरच याबाबत घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे.

Supreme Court- Maratha Reservation News
Dr. Shirish Valsangkar : मनीषा मुसळे-माने धमकी देऊन खात्यावर पैसे भरायला लावायची; साक्षीदारांनी कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा

दरम्यान, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय SCBC प्रवर्गातंर्गत वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाला आव्हान देण्यात आलेल्या याचिकांवर तत्काळ नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या द्विपीठासमोर ही सुनावणी झाली होती. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देताना नवीन खंडपीठाची निर्मिती करण्याचे सांगितले आहे.

Supreme Court- Maratha Reservation News
Maratha Reservation : पदभार हाती घेताच सरन्यायाधीश गवई यांनी मराठा आरक्षणासंदर्भात दिले आदेश; नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय द्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com