Prakash Mahajan News : ...हे भान मनसेच्या प्रकाश महाजनांना का नाही ?

Mahayuti Vs MNS : राज्य सरकारने वक्फ बोर्डाला दिलेल्या निधीवरून मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मतांसाठी ध्रुवीकरण चालणार नाही, असा सज्जड इशारा लोकांनी देऊनही महाजन यांनी त्यापासून बोध घेतलेला दिसत नाही.
Prakash Mahajan
Prakash MahajanSarkarnama

Prakash Mahajan News : देश, राज्याच्या प्रगतीसाठी समाजात सलोखा असावा, शांतता असावी, ही पहिली अट असते. काही राजकीय नेते या सामाजिक सलोख्याला नख लावण्याचे कृत्य करत असतात. अनिश्चित राजकीय भवितव्याच्या गर्तेत अडकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी सरकारने वक्फ बोर्डाबाबत घेतलेल्या एका निर्णयावरून असेच वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणे चांगले, मात्र दाढीवाल्यांना मदत करणे अयोग्य, असे वादग्रस्त विधान करत महाजन यांनी एका समुदायाबाबत त्यांच्या मनात असलेल्या विखाराचे प्रदर्शन केले आहे.

राज्य सरकारने वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. वक्फ बोर्ड हा सरकारच्या अधिपत्याखालीच असतो. वक्फ बोर्ड ही एक वैधानिक संस्था आहे. वक्फच्या मालमत्तांचे नियमन आणि संरक्षण त्याद्वारे केले जाते. वक्फ बोर्ड चुकीचे आहे, असंवैधानिक आहे, असे जर प्रकाश महाजन यांना वाटत असेल तर त्यांनी तसे सांगून ते रद्द करण्याची मागणी सरकारकडे करावी. एखाद्या समाजाच्या प्रतिकावर टीका करून काय साध्य होणार आहे, याचा विचार त्यांनी करायला हवा. प्रकाश महाजन हे भाजपचे दिग्गज नेते दिवंगत प्रमोद महाजन यांचे बंधू आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. मनसेने ही निवडणूक लढवली नाही. 2019 मध्येही मनसेचा एकही उमेदवार रिंगणात नव्हता. 2019 मध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या विरोधात राज्यभरात सभा घेतल्या होत्या. 2024 च्या निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्यांच्यासाठी राज ठाकरे यांनी जाहीर सभाही घेतल्या.

मनसेचा महायुतीला कोणताही फायदा झाला नाही, त्यामुळे विधानसभेची एकही जागा दिली जाणार नाही, असे भाजपचे विदर्भातील आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांनी काही दिवसांपूर्वीच ठणाकावून सांगितले आहे. प्रकाश महाजन यांनी याबाबत चिंतन केल्याचे दिसत नाही.

Prakash Mahajan
Video Mahayuti News : थेट स्ट्राइक रेट सांगत शिंदे गटाच्या 'या' नेत्याचा मोठा दावा; भाजप नव्हे तर महायुतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ

देश म्हणजे काही फक्त नकाशा नसतो. त्यात राहणाऱ्या सर्व समाजांचा, सर्व लोकांचा मिळून देश बनत असतो. देशाच्या प्रगतीत सर्वांचा सहभाग असतो. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही इतरांसह मुस्लिमांनीही बलिदान दिले आहे. देशातील नागरिकांना आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचे, पेहेराव करण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने सर्वांनाच दिले आहे. प्रकाश महाजन यांना राज्यघटना मान्य नाही का, असा प्रश्न त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण होतो आहे.

काहीजणांच्या कृत्यांमुळे अख्ख्या समाजाला वेठीस धरण्याचा प्रकार मुस्लिमांच्या बाबतीत सातत्याने घडतो आहे. जे दोषी आहेत, मग ते मुस्लिम समाजातील असतील किंवा अन्य कोणत्या समाजातील असतील, त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.

Prakash Mahajan
Prakash Ambedkar : "...असे आमचे त्यावेळी ठरले होते!"; आंबेडकरांचे ठाकरेंबाबत खळबळजनक विधान

लोकांना शांतता हवी आहे, महागाई नको आहे. तरुणांना नोकऱ्या हव्या आहेत. शेतकऱ्यांना शेतमालाला भाव हवा आहे. यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ध्रुवीकरणाच्या मुद्द्यांना मतदारांनी थारा दिला नाही. मतदारांना विकास हवा, विकासाच्या गप्पा नको आहेत आणि ध्रुवीकरणही नको आहे. प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांच्या पक्षाने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्या भोजपसोबत केंद्रात सत्तेत असलेल्या तेलुगू देसम पक्षाने आंध्र प्रदेशात मुस्लिमांना विविध सुविधा देणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे. त्याबाबत प्रकाश महाजन यांचे मत काय असेल?

राजकीय पक्षांची विचारसरणी कोणतीही असली, निवडणुकीच्या काळात त्यांनी ध्रुवीकरणाचा प्रयत्न केलेला असला तरी सत्तेत असताना त्यांना सर्व समाजांना सोबत घेऊन चालावे लागते. ध्रुवीकरण चालणार नाही, असा संदेश नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून दिला आहे. प्रकाश महाजन यांनी त्यापासून बोध घेतलेला दिसत नाही. सामाजिक सलोखा खोलवर रुजलेला आहे.

दोन्ही बाजूंकडील मोजक्या विघातक वृत्तींमुळे तो संपुष्टात येणार नाही. वर्षानुवर्षे लोक मिळून-मिसळून राहत आहेत. शेजारचे घर पेटले तर आपलेही घर सुरक्षित राहणार नाही, याची लोकांना जाणीव झालेली आहे. कोणत्याही एका भूमिकेवर ठाम न राहणाऱ्या पक्षाचे नेते असलेल्या प्रकाश महाजन यांनीही समाजहितासाठी ही बाब लक्षात घेतली पाहिजे. त्यांना काही आक्षेप असतील तर ते त्यांनी जरूर मांडावेत, कोणत्याही समुदायाबद्दल तिरकस, हिणकस वक्तव्ये करून काय साध्य होणार आहे, याचा विचार त्यांनी करायला हवा.

(Edited By Deepak Kulkarni)

Prakash Mahajan
MNS On Shiv Sena Thackeray Party : मनसेचा शिवसेना ठाकरे पक्षावर 'हिरवा वार'; मतांसाठी 'कुबाड्या' घ्यावाच लागणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com