Priyanka Gandhi News : आदिवासींची इंदिरामाय,नंदुरबारने अनुभवला 25 वर्षांनी 'तो' क्षण !

Congress Politics, Nandurbar's trible community Experienced that moment after twenty five years : नंदुरबारला सभेनंतर प्रियंका गांधी थेट आदिवासी मतदारांत मिसळल्याने झाली एक राजकीय पुनरावृत्ती..
Priyanka Gandhi
Priyanka Gandhi Sarkarnama

Congress Tribal Politics News : नंदुरबार येथे शनिवारी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सभा झाली.या सभेनंतर त्या आदिवासी कार्यकर्त्यांच्या गर्दीत मिसळल्या. त्यांनी उपस्थितांशी हस्तांदोलन करीत अभिवादन देखील केले.

नंदुरबार मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी आज प्रियंका गांधी यांची सभा झाली. या सभेत प्रियंका गांधी यांनी प्रामुख्याने आदिवासी मतदारांचे प्रश्न उपस्थित केले. आदिवासींच्या राजकारणातील विविध घटना कायदे आणि धोरनांचा काँग्रेसशी असलेल्या संबंध त्यांनी अधोरेखित केला. या निमित्ताने गेल्या दहा वर्षांपासून भाजपने ताब्यात घेतलेला काँग्रेसचा हा बालेकिल्ला हिसकावून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांच्याकडून झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Priyanka Gandhi
Madha Lok Sabha : माढ्याच्या विजयाची चावी पुन्हा माळशिरसच्या हाती; पण फलटण, माणमधील वाढलेली मतेही निर्णायक

या सभेत एका इतिहासाची पुनरावृत्ती झाली.(कै)इंदिरा गांधी आपल्या लोकसभा प्रचाराची सुरुवात नंदुरबार मतदार संघातून करीत असत.याचा संदर्भ यावेळी देण्यात आला. त्याला आदिवासींकडून मोठा प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे 1999 मध्ये काँग्रेस पक्ष अडचणीत होता. त्यावेळी राजकारणापासून अलिप्त असलेल्या श्रीमती सोनिया गांधी यांनी काँग्रेसचा प्रचार करण्याची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी आपली पहिली सभा नंदुरबार येथे घेतली.त्यावेळी आदिवासींनी सोनिया गांधी यांना पाहून त्यांची तुलना इंदिरा गांधी यांच्याशी केली. त्यांचे उच्चार होते, "आमनी इंदिरा माय"

आज प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची सभा झाली.या सभेला प्रचंड म्हणता येईल अशी गर्दी होती. त्यामुळे प्रियंका गांधी यादेखील आनंदी होत्या. सभेनंतर त्या परत निघाल्या असताना त्यांनी आदिवासींच्या गर्दीत मिसळत त्यांच्याशी हस्तांदोलन केले. या भेटीने भारवलेले शेकडो आदिवासी आणि युवक प्रचंड घोषणा देत होते. त्यांच्यातही प्रतिक्रिया होती, ती म्हणजे प्रियंका गांधी यांच्यात त्यांना इंदिरा गांधींचे प्रतीक दिसले. श्रीमती सोनिया गांधी यांनी 1999 मध्ये येथे सभा घेऊन जे केले, 25 वर्षांनी त्याची पुनरावृत्ती प्रियंका गांधी यांनी केली आहे. हे या सभेचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

Priyanka Gandhi
Ajit Pawar Vs Amol Kolhe : नट, नाटककार, अभिनेता...; भर पवासात अजिदादांनी अमोल कोल्हेंना धू धू धुतलं

नंदुरबार मतदार संघात अलीकडच्या निवडणुकांत 2014 पर्यंत काँग्रेसचे (Congress) उमेदवार निवडून येत होते. (कै) माणिकराव गावित हे तब्बल आठ वेळा नंदुरबार मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले होते. 2014 मध्ये पंतप्रधान मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. भाजपच्या हिना गावित गेले दोन टर्म येथे खासदार आहेत. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने ही जागा पुन्हा खेचून आणण्यासाठी प्रचंड ताकद लावली आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Priyanka Gandhi
Imtiaz jaleel News : नवनीत राणांवर टीका करताना इम्तियाज जलील यांची जीभ घसरली!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com