मला निर्णय घेऊ द्या, नायतर...; प्रदेशाध्यक्षांचे थेट नेतृत्वालाच आव्हान

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या दिमतीला ठेवलेल्या सल्लागारांमुळं मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन सिद्धूंनी थेट पक्षनेतृत्वाला आव्हान दिले आहे.
punjab congress chief navjot singh sidhu warns party leadership
punjab congress chief navjot singh sidhu warns party leadership
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी आपल्या दिमतीला ठेवलेल्या सल्लागारांमुळं मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस (Congress) हाय कमांडने सिद्धूंना तंबी देत सल्लागारांना काढून टाकण्यास सांगितले होते. यानंतर 24 तासांतच सिद्धूंच्या सल्लागारांनी राजीनामा दिला आहे. यानंतर संतापलेल्या सिद्धू यांनी थेट पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिले आहे. 

सिद्धू यांचे सल्लागार मलविंदरसिंग माली यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर सिद्धू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या. मला हे स्वातंत्र्य मिळाल्यास पुढील दोन दशके राज्यांत काँग्रेसला वाढवेन. नाहीतर मी कुणालाच सोडणार नाही, असे सिद्धू यांनी म्हटले आहे. सिद्धू यांनी एकप्रकारे पक्षनेतृत्वालाच आव्हान दिले आहे. यावर पक्षनेतृत्व काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. 

पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनीही सल्लागारांवरून सिद्धू यांना तंबी दिली होती. ते म्हणाले होते, सल्लागारांच्या विधानांना संपूर्ण पक्ष आणि राज्याचा आक्षेप आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, ही पक्षाची भूमिका आहे. हे सल्लागार पक्षाने नेमलेले नाहीत. त्यांना काढून टाकण्यासाठी आम्ही सिद्धू यांना सूचना केलेली आहे. त्यांनी असे न केल्यास आम्ही सल्लागारांची हकालपट्टी करू. पक्षाला अडचणीत आणणारे लोक आम्हाला नको आहेत. 

प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेताच सिद्धू यांनी चार सल्लागारांची नेमणूक केली होती.  त्यापैकी प्यारेलाल गर्ग व मलविंदर माली यांनी नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. माली यांनी मागील आठवड्यात काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणले होते. तर गर्ग यांनी थेट अमरिंदरसिंग यांनी पाकिस्तानवर केलेल्या टीकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. दोन्ही सल्लागारांची वक्तव्य समोर आल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. 

दरम्यान, माली यांनी नुकतेच थेट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचेच एक वादग्रस्त चित्र फेसबुकवर टाकल्यानं काँग्रेसला धक्का बसला होता. या चित्रामध्ये मानवी कवटींच्या ढिगाजवळ इंदिरा गांधी उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्या हातात एक बंदूक असून त्यालाही मानवी कवटी लटकलेली दिसत आहे. या वादग्रस्त चित्रावरून विरोधकांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसेच, काँग्रेसमधील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

हे चित्र एका पंजाबी नियतकालिकामध्ये जून 1989 मध्ये छापून आले आहे. 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीची आठवणं करून देणारं हे चित्र असल्यानं पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. भाजप नेते तरूण चुघ यांनी या चित्रावरून थेट सिध्दू यांच्यावर निशाणा साधला आहे. फेसबुकवर अशी पोस्ट करण्याबाबत माली यांनी सिध्दू यांना विचारले होते का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com