पुणे - विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या नऊ जागांपैकी चार जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. त्यातील एक जागा भाजपने रिपब्लिकन पक्षाला द्यावी, अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री, रामदास आठवले यांनी भाजपकडे केली आहे.
याबाबत ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आठवले यांनी म्हटले आहे, की भाजपला मिळणाऱ्या जागांतील एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे करणार आहे. भाजपने एक जागा रिपब्लिकन पक्षाला देऊन सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न करावा.
फडणवीस आणि पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणार असून त्यांना तसे जागा देण्याबाबत ईमेलही करणार असल्याचे आठवले यांनी नमूद केले आहे.
भाजपने एक जागा रिपब्लिकन पक्षाला दिल्यास आंबेडकरी समाजाला ताकद मिळण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत त्याचा भाजपला फायदा होणार आहे, असेही आठवले यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.