Jadhav Vs Kadam : ‘एहेसान फरामोश’ भास्कर जाधवांनी त्यावेळी मला साष्टांग दंडवत घातला होता : रामदास कदमांचा पलटवार

चिपळूणचा लांडगा भास्कर जाधव हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपूस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला.
Bhaskar Jadhav Vs Ramdas Kadam News
Bhaskar Jadhav Vs Ramdas Kadam NewsSarkarnama
Published on
Updated on

खेड : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सांगून मीच १९९५ मध्ये भास्कर जाधव याला तिकिट द्यायला लावले होते. त्यासाठी मी स्वतः शिवसेनाप्रमुखांना विनंती केली हेाती. लोटे येथे हाच भास्कर जाधव जमिनीवर साष्टांग नमस्कार घालून माझ्या पाया पडला होता.

हे विसरला की काय भास्कर जाधव? उद्धव ठाकरे यांना दाखवण्यासाठी तो आता अधिक निष्ठावंत असल्याचा आव आणत आहे, अशा शब्दांत रामदास कदम यांनी आमदार भास्कर जाधव यांना उत्तर दिले. (Ramdas Kadam's strong reply to Bhaskar Jadhav)

खेडमधील सभेत भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी रामदास कदम यांचा उल्लेख तात्या विंचू असा केला होता. त्याला ‘चिपळूणचा लांडगा’ म्हणत कदम यांनी उत्तर दिले आहे.

कदम म्हणाले की, चिपळूणचा लांडगा भास्कर जाधव हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपूस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. त्या ठिकाणी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपूस पुन्हा शिवसेनेत आला आहे. हा दुसऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसणारा बेईमान, बाटगा भास्कर जाधव शिवसेनेचा निष्ठावंत झाला आहे.

Bhaskar Jadhav Vs Ramdas Kadam News
Ramdas Kadam : 'कदमांना संपविण्यासाठी ‘मातोश्री’त शिजलेली कटकारस्थाने उदय सामंत १९ तारखेला उघड करणार'

रामदास कदमांवर बोलण्याची त्याची औकात नाही. भास्कर जाधव हा ‘एहेसान फरामोश’ आहे. त्याला निवडणूक लढविण्यासाठी टेंपोच्या टेंपो साहित्य मी चिपळूणला पाठविले होते.

बाळासाहेब ठाकरे यांना सांगून मीच १९९५ मध्ये भास्कर जाधव याला तिकिट द्यायला लावले होते. लोटे येथे जमिनीवर साष्टांग नमस्कार घालून तो माझ्या पाया पडला होता, हे भास्कर जाधव विसरला वाटतं, असेही कदम यांनी भास्कर जाधवांना सुनावले

Bhaskar Jadhav Vs Ramdas Kadam News
Thackeray Vs Kadam : उद्धव ठाकरेंनी ‘ते’ सिद्ध केले तर मी त्यांच्या घरी भांडी घासेन : रामदास कदमांचे आव्हान

माजी आमदार संजय कदम यांचाही रामदास कदम यांनी समाचार घेतला. त्या संजय कदमला मी मोठं केलं. त्याची औकात नव्हती. त्याला जिल्हा परिषदेला उभा करून दोन-दोन, तीन-तीन वेळा निवडून आणले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केले. मी एक सभा घेतली असती, तर त्या संजय कदम याला विधानभवन बघायला मिळाले नसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com