Killari Earthquake : ‘कृतज्ञता माझ्याबद्दल नको, माझी ती जबाबदारी होती...’

Sharad Pawar Gratitude Ceremony : संकट येतात. मात्र संकटग्रस्तांना मदत करण्याची भावना असलेला एक मोठा वर्ग देशात आहे. तो आपला ठेवा आहे. त्या ठेव्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करायची.
Sharad Pawar Gratitude Ceremony
Sharad Pawar Gratitude CeremonySarkarnama

Killari News : संकट येतात, मात्र संकटग्रस्तांना मदत करण्याची भावना असलेला एक मोठा वर्ग देशात आहे. तो आपला ठेवा आहे. त्या ठेव्याबाबत कृतज्ञता व्यक्त करायची, कृतज्ञता माझ्याबद्दल नाही. माझी एक जबाबदारी होती, ती मी पार पाडली. त्या जबाबदारीला ज्यांनी साथ दिली आणि माणसाला उभं करण्यासाठी ताकद दिली. त्या मदतगारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. दातृत्वाबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी किल्लारी भूकंपावेळी मदतीला धावून आलेल्या सर्वांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. (Rehabilitation of Killari earthquake victims was my responsibility: Sharad Pawar)

लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि परिसरात ता. ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाप्रलयंकारी भूकंप झाला. त्या घटनेला आज ३० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने लातूर आणि परिसरातील नागरिकांनी पवारांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले हाेते. त्यात कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

Sharad Pawar Gratitude Ceremony
Killari Earthquake : ‘पवारसाहब आप पैसों की चिंता मत करो, मैं वर्ल्ड बॅंकसे बात करूंगा’; मनमोहनसिंगांनी १० दिवसांत दिले कोट्यवधी रुपये

पवार म्हणाले की, किल्लारी भूकंपग्रस्तांना मदतीचा ओघ एवढा वाढला की, एके दिवशी आम्हाला ती थांबवावी लागली. घर बांधण्यासाठी अनेक लोकं आणि संस्था पुढे आल्या. शिवसेनेने एक गाव दत्तक घेतले होते, तर काँग्रेस पक्षाने तावशी हे गाव दत्तक घेतले होते. किर्लोस्कर व इतर कारखानदारांनी गावं दत्तक घेतली हेाती. एका वर्षाच्या आत अनेक कामांना गती देण्यासाठी आपण यशस्वी झालो होतो.

किल्लारीच्या भूकंपात अनेक जण अनाथ झाले होते. त्यावेळी शांतीलाल मुथा पुणे परिसरात अनाथासाठी काम करत होते. त्यांना बोलावून सांगितलं की, शांतीलाल, आज संकट मोठं आहे. या भूकंपामुळे अनाथ झालेल्या मुलांना आपल्याला पुन्हा एकदा उभं करायचं आहे. शिक्षणापासून त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी सोय करावी.’ त्यांनीही येथील मुलांना पुण्यात नेऊन शिक्षणाची व्यवस्था केली, असेही पवारांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, शांतीलाल मुथा आणि त्यांचे सहकारी हे या अनाथ मुलांचे पालक झाले. या सर्वांनी उत्तम शिक्षण घेतले आणि अनेकजण उच्च पदावर गेले. त्यात किशोर भोसले हे मुथा यांच्या संस्थेत शिकून सिंगापूरमधील एक मोठी संस्था आहे, त्या संस्थेत ते पदाधिकारी आहेत. बालाजी साठे हे दिल्लीतील एका सहकारी संस्थेत शास्त्रज्ञ आहेत. लिंबाजी परताळे यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला. माधव माने हे पुण्यातील केंद्र सरकारच्या संस्थेत संशोधन केले. सचिन झोणे हे नव्या मुंबईत संशोधन संस्थेत, बाबासाहेब तांबे हे पोलिस अधिकारी बनले. या सर्व मुलांना मुथा यांनी पुण्यात नेऊन घडविले. आज देशात कुठेही संकट आले तर राज्य सरकार त्यांना फोन करतात आणि तुमची लोकं पाठवा, अशी विनंती करतात. त्यांनी स्वतःचा व्यवसाय बंद करून संकटग्रस्तांना मदत करण्याचे एकमेव काम सध्या ते करत आहेत.

Sharad Pawar Gratitude Ceremony
Maharashtra Politics : अजितदादांना आणखी काय हवंय? कारवाया थांबल्या, सत्ताही भेटली; आता ते सहन करावंच लागणार

संकटकाळात त्यावेळी विलासराव देशमुख, पद्मसिंह पाटील, दिलीपराव देशमुख यांचीही मदत मिळाली. कृतज्ञता, सत्कार याची काय आवश्यकता नसते. तुम्ही एकदा सार्वजनिक जीवनात पडला की लोकांच्या बांधिलकशी तडजोड कधी करायची नसते, हा संस्कार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आमच्यावर केला. चव्हाणसाहेबांच्या कारकिर्दीत जेव्हा कोयनेचा भूकंप झाला, तेव्हा त्यांनी अहोरात्र काम केले होते. त्यांच्या कामाची पद्धत बघण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जातही असत. आमच्या मनावर ते संस्कार झाले. आमच्या हातात राज्याची सूत्रे आल्यानंतर राज्यात कुठेही सामान्य माणसांवर संकट आलं तर त्या संकटग्रस्तांना मदत करायची, ही भूमिका तेव्हापासून आमच्या मनात आहे, असेही शरद पवार यांनी नमूद केले.

Sharad Pawar Gratitude Ceremony
Earthquake@1993 : भूकंपाच्या आठवणींनी ३० वर्षांनंतरही काळजाचा थरकाप उडतो...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com