तालिबानला मोठा धक्का! सैन्याने चार जिल्हे ताब्यातून मिळवले परत

अफगाणिस्तानमध्ये आता चक्रे उलटे फिरण्यास सुरवात झाली आहे. अफगाणी सैन्याने तालिबानच्या विरोधात संघर्ष सुरू केला आहे.
resistance forces captures four districts in afghanistan from taliban
resistance forces captures four districts in afghanistan from taliban
Published on: 
Updated on: 

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) सत्ता स्थापन केली आहे. तालिबानने अतिशय वेगाने सत्ता काबिज केल्याने सगळ्यांनाच धक्का बसला होता. परंतु, आता चक्रे उलटे फिरण्यास सुरवात झाली आहे. अफगाणी सैन्याने तालिबानच्या विरोधात संघर्ष सुरू केला आहे. सैन्याने चार जिल्हे तालिबानच्या ताब्यातून परत मिळवले आहेत. या संघर्षात सुमारे 80 तालिबानी ठार झाल्याचे वृत्त आहे.  

अफगाणिस्तानमधील पोल-ए-हिसार, डेह सलाह, बानू आणि कासान हे जिल्हे तालिबानच्या ताब्यातून सैन्याने परत मिळवले आहेत. याबद्दल माजी संरक्षणमंत्री बिस्मिल्ला मुहम्मदी म्हणाले की, तालिबानला विरोध करणे हे आमचे कर्तव्य आहे. तालिबानविरोधी सैन्याने बागलाण प्रांतातील काही जिल्हे तालिबानच्या ताब्यातून सोडवले आहेत. आम्ही जिवंत असू तोपर्यंत आम्ही तालिबानशी संघर्ष करत राहणारच.  

अफगाणिस्तानमधील पंजशीर हा प्रांत सध्या अफगाणिस्तानच्या ताब्यात नाही. तेथे बिस्मिल्ला हे थांबले आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सैन्याने केलेल्या संघर्षात 40 तालिबानी ठार झाले आहेत. याचबरोबर 15 जण जखमी झाले आहेत. तालिबानने मात्र, यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, तालिबानने काबूलमध्ये संचारबंदी लागू केली आहे. रात्री 9 वाजल्यानंतर घराबाहेर पडण्यास नागरिकांनी बंदी करण्यात आली आहे. 

अफगाणिस्तानमधील राष्ट्रीय गुप्तचर संस्थेत काम करणाऱ्या अफगाणी नागरिकांनी शोधण्यासाठी तालिबानने घरोघरी जाऊन शोधमोहीम सुरू केली आहे. अमेरिका आणि नाटोसाठी काम करणाऱ्या अफगाणी नागरिकांचाही शोध तालिबानी घेत आहेत. याबाबतची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने दिली आहे. यामुळे तेथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालिबानने विरोधकांना माफ करण्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षा ते याच्या उलट पावले टाकत आहेत, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

तालिबान्यांनी अध्यक्षीय भवनावर कब्जा मिळवत अफगाणिस्तानात आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरदार अफगाणिस्तानचा नवा प्रमुख असू शकतो. तालिबान्यांनी 15 ऑगस्टला सकाळी राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाय ठेवताच अफगाण सरकार घाबरले होते. त्यांनी चर्चेतून सत्ता परिवर्तनासाठी आवाहन केले होते. त्यानुसार अध्यक्षीय भवनात याबाबत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच अध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला.

अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षांपासून असलेले अमेरिकेचे सैन्य तेथून परतल्यानंतर पुन्हा एकदा तालिबानने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अध्यक्ष बायडन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे संपूर्ण सैन्य माघारी बोलावण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत ठरवली होती. त्याआधी दोन आठवडे तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवला आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com