सांगलीत युती झाली म्हणून आमदार बाबर खुश पण विभुते नाराज

सेना भाजप नेत्यांत येथे वादही फारसे नसले तरी जिल्हा प्रमुख विभूते यांनी नुकतेच खासदार संजय पाटील यांच्यावर शिवसेनेच्या कामांचे श्रेय लाटतात, असा आरोप केला होता.
MLA-Babar-&-shivsena.
MLA-Babar-&-shivsena.
Published on
Updated on

सांगली:  शिवसेना-भाजप युती व्हावी, ही आमदार अनिल बाबर यांची सुरूवातीपासून इच्छा होती. त्यामुळे आमदार या निर्णयावर खुश आहेत. मात्र जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनाच युती रुचली नसून त्यांनी आम्हाला जिल्ह्यापुरती युती मान्य नसल्याचे म्हटले आहे.

अर्थात जिल्ह्यात शिवसेनेचा खानापूर हाच एकमेव मोठा गड आहे आणि तेथे बाबर समर्थकांनी याचे जोरदार स्वागत केल्याने येथे भाजपचाही जीवही भांड्यात पडला आहे. 

सांगली जिल्ह्यात शिवसेनेचा थेट आमदार गेल्या वेळी पहिल्यांदाच झाला आणि ते भाग्य जिल्ह्याच्या सेनेला आमदार बाबर यांनी मिळवून दिले. शिवसेना येथे निवडणुका लढविते पण जिंकण्याचे मेरीट मात्र कोठेही फारसे नाही. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही शिवसेनेला एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. 

जिल्ह्यातील नगरपालिकांतही सेनेचे अस्तित्व नाही. शहरी पक्ष अशी ख्याती असूनही सांगली-मिरजेतही अस्तित्व आंदोलने-मोर्चे यापुरतेच आहे. शिवसेना येथे वाढावी म्हणून संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांना आता कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष पद दिले आहे. अर्थात सांगली जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत शिवसेनेने कमावले काय, या प्रश्‍नाचे उत्तर महापालिकेच्या निकालाहून वेगळे काहीच मिळत नाही. 

सेना भाजप नेत्यांत येथे वादही फारसे नसले तरी जिल्हा प्रमुख विभूते यांनी नुकतेच खासदार संजय पाटील यांच्यावर शिवसेनेच्या कामांचे श्रेय लाटतात, असा आरोप केला होता. बाबर आणि संजय पाटील असा संघर्ष होता पण तो आता दोघांनीही पुढाकार घेवून मिटवला आहे. मात्र सांगलीत लोकसभेसाठी स्वबळावर लढणार असल्याचे सांगणाऱ्या विभुतेंची आता पंचाईत झाली आहे. अर्थात युतीच्या निर्णयावर विभुते सोडले तर अन्य पदाधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. 

विभुते म्हणाले, सध्या जिल्ह्यात भगवा सप्ताह निमित्त पंचायत समितीनिहाय जिल्हाभर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना ऐकून घेवून त्या वरिष्ठांपर्यंत पोहचवल्या जाणार आहेत. गेल्या चार वर्षांत भाजने शिवसेनेला किंमत दिली नाही, हे आम्ही संपर्क प्रमुखांना कळविणार असल्याचे ते म्हणाले. 

दरम्यान सरसगट सांगली जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना युतीला विरोध दिसत नाही, हे देखील आमदार बाबर आणि त्यांच्या समर्थकांनी घेतलेल्या भूमिकेतून स्पष्ट होते. जिल्ह्यात एकूण आठ जागा आहेत त्यापैकी सध्या चार विद्यामान आमदार भाजपचे आहेत तर एक शिवसेनेचा आहे. सांगली, मिरज, जत, शिराळा या जागा भाजपकडे आहेत तर खानापूर, पलूस-कडेगाव, इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ या जागा शिवसेनेकडे आहेत. युतीमुळे अर्थात जिल्ह्यात भाजपला फायदा मिळू शकतो. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com