Sangram Thopte BJP Joining: गोरे,कुल यांची मैत्री अन् विखेंचा सल्ला; काँग्रेसचा 'हात' सोडत थोपटेंनी थेट भाजपची वाट धरली

Sangram Thopte Political News: सध्या राज्याच्या राजकारणात काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत कुटुंबातील तीन टर्मचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा आहे. मागील पाच दशक काँग्रेसची निष्ठावंत असलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीची भाजप पक्षांमध्ये येण्याचा विचार करतो या मागे अनेक घडामोडी घडल्या आहेत.
Sangram Thopate .jpg
Sangram Thopate .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सध्या राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालथ पाहायला मिळत आहेत. एकीकडे ठाकरे बंधू एकमेकांना टाळ्या देण्याच्या गोष्टी करत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमधील दिग्गज नेते पक्षाला सोडचिट्टी देऊन महायुतीतील मित्र पक्षांमध्ये पक्ष प्रवेश करत आहेत. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने पुढील पाच वर्ष आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा दृष्टिकोनातून अनेक नेते आपलं भवितव्य सत्ताधारी पक्षात पाहत आहेत त्यातून सध्या मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश पाहायला मिळत आहेत.

सध्या राज्याच्या राजकारणात काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत कुटुंबातील तीन टर्मचे माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा आहे. मागील पाच दशक काँग्रेसची निष्ठावंत असलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीची भाजप पक्षांमध्ये येण्याचा विचार करतो या मागे अनेक घडामोडी घडल्या आहेत. काँग्रेसकडून आपल्याला सातत्याने डावले जात असल्यामुळे आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं संग्राम थोपटे यांनी सांगितलं असलं तरी त्यांचा काँग्रेस मधून भाजपमध्ये येण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी काही भाजपमधील नेत्यांनी मदत केली असल्याचं समोर आलं आहे.

संग्राम थोपटे यांचा भाजपमधील प्रवेश सुकर करण्यासाठी त्यांचे मित्र मान खटाव चे आमदार जयकुमार गोरे आणि दौंड चे भाजप आमदार राहुल कुल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे समोर आले आहे. 2019 च्या निवडणुकीपूर्वी देखील संग्राम थोपटे यांना राहुल कुल यांच्या माध्यमातून भाजप प्रवेशाची ऑफर देण्यात आली होती असं सांगण्यात येतं त्यावेळी प्राथमिक बैठका देखील पार पडल्या मात्र हा प्रवेश होऊ शकला नाही.

Sangram Thopate .jpg
Sharad Pawar On Yugendra Pawar : युगेंद्र पवारांच्या वाढदिवसालाच आजोबांनी टाकली गुगली; म्हणाले, आता युगेंद्राच्या हातात सरकार नाही...

त्यानंतर 2022 ला सरकार पडल्यानंतर देखील भाजपकडून(BJP) काँग्रेसच्या काही आमदारांना ऑफर देण्यात आल्याचे सांगितले जाते. त्या आमदारांमध्ये थोपटे यांचा देखील समावेश होता. यावेळी देखील भाजपसोबत या असा सल्ला त्यांना आमदार राहुल कुल आणि जयकुमार गोरे यांनी दिला होता. तसंच सातत्याने होत असलेल्या अन्यायामुळे आता थोपटे यांनी पक्षाला सोडचिट्टी देत भाजपमध्ये यावं असा सल्ला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता. त्यावेळी सुट्टींनी प्रवेश करणे टाळले असले तरी काँग्रेसमध्ये राहून देखील भाजप नेत्यांशी जवळीक ठेवली होती.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील थोपटे यांच्या भाजप प्रवेशाबाबतची चाचपाणी करण्यात आली होती. मात्र, लोकसभेत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्याने विधानसभेत देखील आघाडीसाठी पॉझिटिव्ह वातावरण राहण्याची शक्यता जाणवल्याने थोपटे यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे सांगितलं जातं.

Sangram Thopate .jpg
Ajit Pawar Politics: सरकारवरचा विश्वास उडाला? बांधकाम कंत्राटदार सरकारला बजावणार कायदेशीर नोटीस!

मात्र, 2024 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चांनंतर थोपटे यांनी कूल यांना भाजप प्रवेशाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर कुल यांनी मध्यस्थीची भूमिका घेत सुरुवातीला राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नंतरच्या काळामध्ये केंद्रीय नेतृत्वाशी थोपटे यांचा संवाद करून दिला. यामध्ये जयकुमार गोरे यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं सांगितलं जातं.

यानंतर थोपटेंच्या प्रवेशाबाबत भाजपच्या अंतर्गत बैठकीत देखील झाल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील पक्ष नेतृत्वाकडे थोपटे यांच्या प्रवेशाबाबत सकारात्मक बाजू मांडली असल्याचं सांगितलं जात आहे. दोनदा पक्षप्रवेशाबाबत हुलकावणी दिल्यानंतर तिसऱ्यांदा राहुल कुल, जयकुमार गोरे यांच्या मैत्रीतून आणि विखे पाटलांच्या सल्ल्यातून हा प्रवेश घडून आल्याचा सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com