मुंबई : भाजपने महाराष्ट्रात केलेल्या घटनाबाह्य कृतीच्या निषेधार्थ मंगळवारच्या (ता. 26) संविधान दिवस या सरकारी सोहळ्यावर विरोधी पक्ष बहिष्कार घालणार असून त्याऐवजी कॉंग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमास सर्व विरोधी खासदार उपस्थित राहणार आहेत.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार पक्षाचे खासदारही त्यात सहभागी होणार आहेत. त्या कार्यक्रमाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, अनिल देसाई आदींनी श्रीमती गांधी यांच्या 10"जनपथ' या निवासस्थानी जाऊन चर्चा केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.