Shivsena Politics : शिवसेनाप्रमुख 'उप' नसतो, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणं शिवसैनिकांना आवडेल का?

Shivsena Politic Eknath Shinde Deputy Chief Minister : शिवसेनाप्रमुख पद तांत्रिकदृष्ट्या एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे घेतले नसले तरी शिवसेनेचे प्रमुख आत्ता तेच आहेत. विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अवघ्या 20 जागा मिळाल्या आहेत.
Shivsena eknath Shinde group
ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Politics : मराठी माणसाच्या अस्मितेचा मुद्द्यावर निर्माण झालेली शिवसेनेत सर्वात प्रमुख पद म्हणजे शिवसेनाप्रमुख. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेनाप्रमुख हे रिक्त ठेवण्यात आले. उद्धव ठाकरेंनी जाहीर केले की शिवसेनाप्रमुख एकच बाळासाहेब ठाकरे त्यामुळे हे पद आपण आपल्याकडे घेणार नाही. शिवसेनेतील फूटीनंतर अधिकृतपणे शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळाले. त्यानंतर देखील एकनाथ शिंदेंनी शिवसेनाप्रमुख हे पद आपल्याकडे घेतले नाही. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून पक्षातील अधिकारी आपल्याकडे ठेवले.

शिवसेनाप्रमुख पद तांत्रिकदृष्ट्या एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे घेतले नसले तरी शिवसेनेचे प्रमुख आत्ता तेच आहेत. विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अवघ्या 20 जागा मिळाल्या आहेत. तर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 57 जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे खरी शिवसेना आपलीच या शिंदेंच्या दाव्याला आणखी ताकद मिळाली आहे.

शिवसेना भाजप,राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत देखील सहभागी होणार आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या प्रमुखाने उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ असेल. आपल्या प्रमुखाच्या नावासमोर 'उप' हे शिवसैनिकांना आवडेल का?

Shivsena eknath Shinde group
Mahayuti News : शपथविधीपूर्वीच ट्विस्ट! एकनाथ शिंदेंनंतर अजितदादांनी फडणवीसांसमोर ठेवली 'ही' वेगळी अट

बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख होते त्यावेळी ते जाहीरपणे सत्तेतील पदांवर टीका करत होते. आपल्याला सगळ्यांपेक्षा शिवसेनाप्रमुख हे पद मोठे वाटते हे ते जाहीर भाषणांमधून सांगत होते. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्यानंतर शिवसेनाप्रमुख पद आपल्याकडे न घेता शिवसेनेचे कार्यध्यक्षपद आपल्याकडे ठेवत पक्षाचा कारभार पाहिला. महाविकास आघाडीसोबत सत्तेत सहभागी होताना राज्याचे मुख्यमंत्रिपद उद्धव ठाकरेंनी स्वीकारले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. भाजपने सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे महायुतीमध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. तर, अजित पवार उपमुख्यंत्रिपदाची शपथ आज घेणार आहेत. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाहीत, अशी चर्चा सुरू असताना आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ एकनाथ शिंदे घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना त्यांच्या पक्षसंघटनेवर प्रदिर्घ परिणाम होणाची शक्यता असते. शिवसेनेचा मुख्य नेता मंत्रिमंडळात कोणाच्यातरी हाताखाली काम करणार आहे हे मुळात शिवसैनिकांना किती पटेल. 2014 च्या युती सरकारमधील अनुभव शिवसेनेसाठी चांगला नव्हता. त्यामुळे आत्ता स्वबळावर बहुमताच्या जवळ असलेल्या भाजपकडून एकनाथ शिंदे यांची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या मुख्य नेत्याची ही कोंडी शिवसैनिकांना आवडेल का?

संघटना मजबूत करण्याची संधी सोडली

एकनाथ शिंदे हे स्वतः सरकारमध्ये सामील होणार आहेत. त्यामुळे मैदानावर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कुठलाही दुसरा मोठा नेता त्यांच्याकडे नाही. शिंदेसोबतचे जे दुसरे नेते आहेत त्यांना देखील सत्तेत सहभागी होण्यात रस आहे. या स्थितीत पक्षसंघटनेला पूर्णवेळ देऊन 2029 साठी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, अशी भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण करणारा नेता नसल्याने पक्षसंघटन दुर्बल होण्याचा धोका आहे.

भाजपच्या स्वबळाला शिवसेनेची अडसर?

भाजपचा विजयाचा स्ट्राईक रेट हा तब्बल 90 टक्के आहे. निकाल लागल्यानंतर भाजप नेत्यांकडून 2029 च्या तयारीला लागा, असे संदेश देण्यास सुरुवात केली आहे. भाजपला स्वबळावरच्या विजयासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेनाच अडसर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तेतून शिवसेनेला नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Shivsena eknath Shinde group
Ashok Chavan : अशोक चव्हाण म्हणतात, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, हीच अपेक्षा होती!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com