Mahayuti News : शपथविधीपूर्वीच ट्विस्ट! एकनाथ शिंदेंनंतर अजितदादांनी फडणवीसांसमोर ठेवली 'ही' वेगळी अट

Mahayuti Government Formation : विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्याने गुरुवारी सायंकाळी आझाद मैदानावर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्याने गुरुवारी सायंकाळी आझाद मैदानावर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याबाबत सस्पेन्स कायम असतानाच शिंदे व फडणवीस यांची बैठक पार पडली. या बैठकीत खातेवाटपाबाबत शिंदेंनी मोठी अट घातली असल्याचे समजते. त्यावर फडणवीस यांनी वरिष्ठांशी चर्चा करून कळवितो, असा निरोप दिला आहे.

त्याच वेळी दुसरीकडे अजितदादांनी मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबत भाजपसमोर एक अट ठेवली असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे शपथविधीपूर्वीच राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहावयास मिळत आहे.

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर होऊ घातला आहे. यावेळी होत असलेल्या या दिमाखदार शपथविधी सोहळ्यास पीएम नरेंद्र मोदी यांच्यासह १९ राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, भाजपचे (BJP) बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष या शपथविधी सोहळ्याकडे लागले आहे.

बुधवारी रात्री मुंबईत महायुतीच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. अजित पवार यांनी मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबत भाजपसमोर एक अट ठेवली असल्याचे पुढे आली आहे. त्यांनी महायुतीच्या खातेवाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. आधी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेची मंत्रिपदे फायनल करा, त्यानंतर आम्ही आमच्या मंत्रिपदांची चर्चा करु, असे अजित पवार यांनी फडणवीस यांना कळवले असल्याचे समजते.

त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची बुधवारी रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्थ खातं कायम राहणार यासोबतच एकनाथ शिंदेना जितकी खाती मिळतील तितकीची खाती आम्हाला देखील मिळायला हवीत, ही आमची भूमिका कायम असल्याची माहिती राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याने दिली. दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाकडून यंदा मंत्रिमंडळात जुन्याऐवजी काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वाना तांबाबत उत्सुकता लागली आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde : मोठी अपडेट! भाजपचा गृह अन् नगरविकास खातं देण्यास स्पष्ट नकार, आता शिंदेंची 'या' खात्याची 'डिमांड'

सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर गुरुवारी सकाळपासून गडबड दिसत आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येऊन अजित पवार यांचे अभिनंदन करत आहेत. गुरुवारी सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची रीघ देवगिरी बंगल्यावर लागली आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Kolhapur Politics : इचलकरंजीच्या नव्या आमदाराची कसोटी, महापालिकेची पहिली निवडणूक कोण जिंकणार?

दरम्यान, महायुतीच्या आजच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी पुन्हा एकदा अमित शाह आणि महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार असल्याचे समजते. या बैठकीत मंत्रीमंडळातील रखडलेल्या खातेवाटपाबाबत या सर्व नेतेमंडळीत चर्चा होणार का, याची सर्वाना उत्सुकता लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थ खात्यासोबत १० मंत्रीपदाची मागणी करण्यात आली असल्याचे समजते.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Shiv Sena News : निवडणुकीच्या आखाड्यात 'धारातीर्थ' पडलेल्या पाच शिलेदारांना शिंदेंकडून दिलासा; तुम्हाला न्याय देऊ!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com