Maval Lok Sabha Exit Poll : ठाकरेंच्या शिलेदाराचं काम महाविकास आघाडीनं केलं नाही? 'एक्झिट पोल'मध्ये बारणेंची हॅटट्रिक तर वाघेरे 'बॅकफूट'वर

Shrirang Barne Vs Sanjog Wghere News lok Sabha Election Exit Poll : एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजात या ठिकाणाहून बारणे हे आघाडी घेतली असे चित्र आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षाने वाघेरे यांचे काम केले नसल्याची चर्चा आहे.
Sanjog Waghere Patil, Shrirang Barne
Sanjog Waghere Patil, Shrirang BarneSarkarnama

Mawal Lok Sabha News : मावळातील लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. मात्र, बारणे यांची हॅटट्रिक रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी संजोग वाघेरे यांना रिंगणात उतरवले होते. ठाकरेंच्या शिलेदाराचं काम महाविकास आघाडीनं केलं नाही ? त्यामुळे 'एक्झिट पोल'मध्ये बारणेंची हॅटट्रिक होण्याची शक्यता वर्तवली आहे तर त्याचा फटका वाघेरेना बसणार असल्याने ते 'बॅकफूट'वर येणार आहेत.

सुरुवातीपासूनच चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत शेवटपर्यंत उत्सुकता शिगेला पोहचली होती. मात्र, एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजात या ठिकाणाहून बारणे हे आघाडी घेतली असे चित्र आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षाने वाघेरे यांचे काम केले नसल्याची चर्चा जोरात सुरु आहे. त्यामुळेच वाघेरेंच्या विजयाच्या समीकरणाला ब्रेक लागल्याची चर्चा आहे.

2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मुंबई-पुणे महामार्गाच्या दुतर्फा पसरलेल्या मावळ मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. मावळच्या पिंपरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा प्रभाव दिसून येतो. या मतदार संघात भाजपनेही स्थानिक पातळीवरील अनेक बडे मासे गळाला लावून या भागात वर्चस्व मिळवले होते, तर रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचादेखील प्रभाव दिसून येतो.

Sanjog Waghere Patil, Shrirang Barne
Shivsena Analysis : ठाकरेंना काय फरक पडला ? मोदी असो व नसो दिल्लीत हवाच हवा

या मतदार संघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण या एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या सहा ठिकाणी सध्या महायुतीचे आमदार आहेत. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप (Ashvini Jagtap), पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर हे दोघेजण भाजपचे आमदार आहेत, तर उरणचे अपक्ष आमदार महेश बाल्दी यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील शेळके, तर पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे हे दोन आमदार आहेत. कर्जत मतदारसंघातील महेंद्र थोरवे हे शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर महायुतीचे वर्चस्व आहे. या ठिकाणी त्या तुलनेत महविकास आघाडीचा एकही आमदार नाही.

मावळ मतदारसंघावर मराठा आरक्षणाचा अंडरकरंट जाणवेल असे चित्र होते. मात्र, याठिकाणचे दोन्ही उमेदवार वाघेरे आणि बारणे (Shrirang Barne) असे दोघेही मराठा उमेदवार असल्याने मतदारसंघात आंदोलनाचा प्रभाव दिसून आला नाही. त्यासोबतच

या उमेदवारांचा विजय घाटावरच्या आणि घाटाखालच्या विधानसभा मतदारसंघातील मतदानावर अवलंबून आहे. पिंपरी, चिंचवड, मावळ या घाटावरील तीनही विधानसभा मतदारसंघात या दोघांनाही मतदान झाले आहे. त्यामुळे घाटाखालील पनवेल, कर्जत आणि उरणमधून कोण किती लीड घेणार, यावरच बारणे आणि वाघेरेंचे खासदारीकचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे बोलले जात आहे.

Sanjog Waghere Patil, Shrirang Barne
Latur Lok Sabha Exit Poll 2024 : लातूर मतदारसंघात काँग्रेस व भाजपमध्ये कांटे की टक्कर !

एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Ajit pawar) यांच्या बंडामुळे मावळमध्ये मोठे बदल घडले आहेत. 2019ला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये लढत झालेल्या या मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातच लढत झाली. उद्धव ठाकरेंनी खासदार श्रीरंग बारणे यांनी बंडखोरी केल्याने त्यांना पराभूत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या ठिकाणी सर्व यंत्रणाही कामाला लावली होती.

सुरुवातीच्या काळात एकतर्फी वाटणारी लढत संजोग वाघेरेंनी आघाडी घेतली होती. प्रचारात कमी न पडता त्यांनी महायुतीच्या गडाला अनेक हादरे दिले. ऐन निवडणूक काळात भाजपच्या माजी नगरसेविका लीना गरड यांनी हाती शिवबंधन बांधले. ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात हा पक्ष प्रवेशाचा सोहळा झाला. यानिमित्ताने महायुतीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या भाजपला खिंडार पडल्याचे चित्र दिसले. या नगरसेविकेचा प्रवेश महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी धक्का मानला जात होता.

Sanjog Waghere Patil, Shrirang Barne
Hingoli Lok Sabha Exit Poll 2024 : हिंगोलीत शिंदेंचा डाव फसला; ठाकरेंचे आष्टीकर बाजी मारणार

महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र सुरुवातीच्या काळात दिसत होते. मावळचे आमदार सुनील शेळके व भाजपचे (Bjp) माजी आमदार बाळा भेगडे एकत्र येऊन बारणे यांचा प्रचार करतील का ? याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली होती. मात्र, याठिकाणी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वात समन्वय घडवून प्रचार यंत्रणा सक्रिय केली. त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात बारणे यांना झाला.

महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे यांची प्रचार यंत्रणा सुरुवातीपासून काहीशी विस्कळीत दिसली. त्यांच्या प्रचारात महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेत्यांची फळी उतरली होती. मात्र, दुसऱ्या फळीतील नेते सक्रिय दिसत नव्हते. त्यासोबतच ग्राउंड लेवलला प्रचार यंत्रणा राबविताना कसरत करावी लागली. शेवटपर्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत बारणे आघाडी घेतील असा अंदाज पोल्सने वर्तवला आहे.

Sanjog Waghere Patil, Shrirang Barne
Mawal Lok Sabha Election : पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत कमी मतदान; फटका कोणाला, वाघेरे की बारणे ?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com