Ahmednagar Politics: शरद पवारांनी डाव टाकला; अजितदादांच्या निलेश लंकेंना देणार दणका?

NCP News: सुजित झावरे आणि शरद पवार यांच्या भेटीने आमदार निलेश लंकेंचं टेन्शन वाढणार...
Sharad Pawar, Sujit Zaware and MLA Nilesh Lanke
Sharad Pawar, Sujit Zaware and MLA Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्या गटात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे यांच्यासह पक्षातील अनेक तरुण आमदारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांचाही समावेश आहे.

2019 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणूक लढवत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले निलेश लंके हे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसून आले. मात्र, शेवटी मतदारसंघातील विकासकामे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

Sharad Pawar, Sujit Zaware and MLA Nilesh Lanke
Sugarcane Price Control Committee: राजू शेट्टींना मोठा धक्का; राज्य सरकारने ऊस दर नियंत्रण समितीतून वगळले...

पण आता याच मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि 2019 पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेकदा विधानसभा निवडणूक लढवलेले सुजित झावरे यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेत विविध विषयावर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

विशेष म्हणजे स्वतः शरद पवार यांनी सुजित झावरे यांना मुंबईत बोलावत पारनेरसह जिल्ह्यात कामाला लागण्याचे सुचवले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आमदार निलेश लंके यांचे टेन्शन वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नगर जिल्ह्यात पवार यांनी सातत्याने ज्या मतदारसंघात विशेष आणि वैयक्तिक लक्ष घातले असे अकोले, पारनेर, श्रीगोंदा हे मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील जनतेने आतापर्यंत पवार साहेबांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही, हे सातत्याने दिसून आले आहे. 2019 ला अकोल्यात वैभव पिचड भाजपात गेले. मात्र, येथील जनतेने पवार साहेबांचा शब्द मानत डॉ.किरण लहामटे या नवख्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करून दाखवले.

Sharad Pawar, Sujit Zaware and MLA Nilesh Lanke
Amarnath Yatra Update: अमरनाथ यात्रेत अडकलेल्या भाविकांसाठी 'या' मंत्र्यांचा थेट राज्यपालांना फोन; अन्...

हीच परिस्थिती पारनेरमध्ये होती आणि निलेश लंके पहिल्याच टर्मला मोठ्या मताधिक्याने निवडून आले. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार सोबत जाताना आमदार लहामटे आणि आमदार लंके यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार यांच्या सोबत जाणे पसंत केले. त्यामुळे पवार कुठेतरी वैयक्तिक दुखवल्याची चर्चा असून त्या दृष्टीने पारनेर, अकोले मतदारसंघ पुनर्बांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

अकोले-पारनेरमधून नव्या उमेदवाराची बांधणी सुरू केल्याचे बोलले जात आहे. या दृष्टीने अकोल्यातील सुनीता भांगरे आणि पारनेरचे सुजित झावरे यांची झालेली शरद पवार यांच्यासोबतची भेट येथील संभाव्य राजकारणाची दिशा देणाऱ्या ठरू शकणार आहेत. या भेटीनंतर सुजित झावरे आता पारनेरमध्ये तर अकोल्यातून पिचड पिता-पुत्र देखील काय भूमिका घेणार? हा उत्सुकतेचा विषय असणार आहे.

Sharad Pawar, Sujit Zaware and MLA Nilesh Lanke
Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंचं परळीत 'ग्रँड वेलकम'! बॅनरवर झळकले गोपीनाथ मुंडे,शरद पवार, पंकजा मुंडे !

2019 ला सुजित झावरे उमेदवारी मिळणार नसल्याने आणि वैभव पिचड वैयक्तिक अडचणीतून राष्ट्रवादीपासून दूर गेल्याचे बोलले जाते. मात्र, आता बदलत्या राजकीय परिस्थितीत या नेत्यांना शरद पवारांच्या माध्यमातून पुन्हा संधी असल्याचे आणि याला हे नेते काय प्रतिसाद देणार यावर सर्व अवलंबून असणार आहे. सुजित झावरे 2019 नंतर खासदार सुजय विखे यांच्या जवळ असून त्या माध्यमातून त्यांनी अनेक विकासकामांसाठी निधी पदरात पाडून घेतला आहे. त्यामुळे सुजित झावरे काय निर्णय घेणार? हे पाहावे लागेल.

एकूणच नगर जिल्ह्यातील अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात विविध राजकीय घडामोडी आता घडताना दिसत असून गेलेले आमदार नजीकच्या काळात काय भूमिका घेतात? यावर बरेच काही अवलंबून आहे. पण असं असलं तरी शरद पवारांनी पर्यायी नेतृत्व उभे करण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा आहे. या दृष्टीने येणाऱ्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महत्वाचे उलटफेर अपेक्षित मानले जात आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com