Sushma Andhare VS Jyoti Waghmare: फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंना शह देणाऱ्या डॉ. ज्योती वाघमारेंना कोणी घडवले माहितीये ?

Shiv Sena Dasara Melava 2023 : डॉ. ज्योती वाघमारे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
 Jyoti Waghmare
Jyoti WaghmareSarkarnama
Published on
Updated on

सचिन वाघमारे

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गटाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. दोन्ही गटांनी एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र, या वेळी सुषमा अंधारे यांना शह देण्यासाठी शिंदे गटाच्या डॉ. ज्योती वाघमारे यांना मैदानात उतरविले.

यामुळे शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यात पहिल्याचवेळी मिळालेल्या भाषणाच्या संधीचे सॊने करताना ठाकरे गटांवर चौफेर टीका केली. त्यामुळे डॉ. ज्योती वाघमारे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. कोण आहेत त्या डॉ. ज्योती वाघमारे जाणून घेऊयात..

सोलापुरातल्या आंबेडकरी चळवळीत गेल्या अनेक दिवसांपासून काम करणारा चेहरा म्हणून डॉ. ज्योती वाघमारे यांची ओळख आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते, एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचे. पण चळवळीतील त्यांचे काम पाहून नागरिकांनी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Jyoti Waghmare
Dasara Melava 2023 News : मेळावे यशस्वी झाल्याने शिंदे-ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण...

सुरुवातीच्या काळात मानवी हक्क अभियान, विद्रोही संस्कृतिक चळवळ, आंबेडकरी चळवळ आदी माध्यमांतून कार्य सुरू केले. त्यानंतर २००२ ते २००४ दरम्यान त्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या संपर्कात आल्या. प्रणिती शिंदे यांच्या जाई-जुई प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी काही काळ समाजकार्य केले.

त्यानंतर त्यांनी काही निवेदिका म्हणून काम केल्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित मोठी व्याख्याने दिली.

 Jyoti Waghmare
Amol Mitkari News : त्यांना चर्चाच करायची होती, तर कुठेही भेटू शकले असते; रस्ता बदलण्याचा प्रश्‍नच नाही !

अल्पावधीतच त्या फर्ड्या वक्त्या म्हणून परिचित झाल्या. त्या वालचंद कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. मराठीवर प्रभुत्व असल्याने वक्तृत्वाने त्यांनी मंच गाजवले. त्यांच्या कार्याची दाखल घेत आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांना काँग्रेसमध्ये सामावून घेतले. ज्योती वाघमारे यांनीदेखील २०१४ मध्ये सोलापूर महिला काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून काम केले, पण त्यानंतर त्या काही काळ सक्रिय राजकारणापासून अलिप्त झाल्या होत्या.

त्यानंतर जून २०२२ मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेनेत पडलेल्या फुटीत त्यांना संधी मिळाली. डॉ. ज्योती वाघमारे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी शिंदे गटात महिला नेतृत्वाची मोठी पोकळी होती. त्यांनी प्रवेश करून ती पोकळी भरून काढण्याचे काम केले. त्यामुळे त्यांना बक्षीसी म्हणून शिंदे गटाकडून त्यांची नियुक्ती शिवसेनेच्या राज्य प्रवक्ता म्हणून करण्यात आली. त्यासोबतच त्यांच्याकडे संपर्कप्रमुख धाराशिव जिल्हा ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली.

या राजकीय एन्ट्रीनंतर त्या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर देण्यासाठीच ज्योती वाघमारे यांची निवड करण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचवेळी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी जोरदार एन्ट्री केली आहे.

शिंदे गटाच्या विचारांचे सोने लुटताना त्यांनी आक्रमक पद्धतीने भाषण करीत सर्वांची मने जिंकली. दसरा मेळाव्यातील घणाघाती भाषणातून ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. या वेळी त्यांनी विधान परिषेदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार मनीषा कायंदे व शीतल म्हात्रे यांच्यावर मात करीत बोलण्याची संधी मिळवली.

Edited By- Ganesh Thombare

 Jyoti Waghmare
Kolhapur Loksabha Election 2024 : लोकसभेच्या मैदानात वस्तादांचा निघणार घाम; कोल्हापूर-हातकणंगलेत कसोटी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com