Tamil Nadu Politics : तमिळनाडूत सत्ता स्थापनेत उशीर, विजयसाठी सहानुभूतीची लाट! सेंगोत्तैयानांच्या 'मास्टर प्लॅन'ने सगळेच आवाक!

Sympathy Politics Vijay TVK : काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाच्या मदतीने विजय यांचा पक्ष 116 पर्यंत पोहोचत आहे. मात्र, राज्यपालांनी 118 चे बहुमत असल्याशिवाय सत्ता स्थापन करू देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Vijay during a political meeting amid growing public sympathy over the delay in Tamil Nadu government formation.
Vijay during a political meeting amid growing public sympathy over the delay in Tamil Nadu government formation.sarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu News : तमिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. अभिनेता थलवती विजय यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांनी तब्बल 108 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाच्या मदतीने विजय 116 पर्यंत पोहोचत आहे. मात्र, राज्यपालांनी 118 चे बहुमत असल्याशिवाय सत्ता स्थापन करू देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या सगळ्या घडामोडीमध्ये विजय राज्यपाल राजेंद्र कार्लेकर यांना दोन वेळा भेटले. दोन्ही वेळा त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. विजय यांच्याकडे बहुमत नसताना ते सारखे राज्यपालांकडे जात आहे, यावरून चर्चा सुरू आहे. मात्र, या मागे टीव्हीके पक्षाची मोठी रणनीती असल्याची चर्चा आहे.

टीव्हीकेकडे तब्बल 50 वर्षांचा संसदीय प्रणालीचा अनभुव असणारे KA सेंगोत्तैयान यांच्यासारखे नेते आहेत. तब्बल 10 वेळा ते विधानसभेत निवडून गेले आहेत. एडीएमके पक्षात ते होते. जयललिता यांचे विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख होते. सभागृह नेता म्हणून त्यांनी काम केले आहे. अनेकवेळा ते जयललिता यांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील होते.

Vijay during a political meeting amid growing public sympathy over the delay in Tamil Nadu government formation.
Tamil Nadu Results: तमिळनाडूची सत्ता गमावल्यानंतर एम के स्टॅलिन यांना दुसरा जबर हादरा, 'टीव्हीके'चे उमेदवार एस.बाबू ठरले 'जायंट किलर'

तब्बल 50 वर्षांचा सभागृहात काम करण्याचा अनुभव असलेला नेता सोबत असून देखील टीव्हीकेचे प्रमुख राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेसाठी दावा करत आहेत. त्यामागे विजय यांच्या बद्दल राज्यभर सहानुभूती निर्माण व्हावी, अशी रणनीती असल्याची चर्चा राजकीय रणनीतीकारांमध्ये आहे. आणि त्यामागे KA सेंगोत्तैयान असल्याचे सांगितले जात आहे.

सेंगोत्तैयान यांची ही रणनीती यशस्वी होताना दिसून येत आहे. कारण सर्वात मोठा पक्ष असून देखील राज्यपाल सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देत नसल्याचे मत लोकांमध्ये तयार होत आहे. आणि सत्ता स्थापनेला उशीर होत असताना टीव्हीकेला सहानुभूतीच्या जोरावर इतर राजकीय पक्षांशी पाठींब्यासाठी वाटाघाटी करण्यासाठी वेळ मिळत आहे.

सेंगोत्तैयान यांचा राजकीय इतिहास

KA सेंगोत्तैयान हे 10 व्यांदा आमदार झाले आहेत. टीव्हीकेचे एग्जीक्यूटीव्ह कमिटीचे चीफ कोऑर्डिनेटर आहे. मागील 50 वर्षांपासून ते निवडणूक जिंकत आहेत. एडीएमकेसोबत त्यांचा राजकीय प्रवास सुरू होता. जयललिता यांचे ते विश्वास होते. सभागृह नेता आणि मंत्री म्हणून देखील त्यांनी जबाबादारी पार पाडली आहे. 2021 में गोबिचेट्टीपलयम मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एडीएमकेने संगठन सचिव आणि जिल्हा सचिव पदावरून हटवले होते. त्यानंतर त्यांनी थेट टीव्हीके प्रवेश करून विजय मिळवला.

Vijay during a political meeting amid growing public sympathy over the delay in Tamil Nadu government formation.
Thalapathy Vijay performance : तमिळनाडूत धक्कादायक ट्विस्ट; सत्ता काबीज केलेल्या विजय यांच्या वडिलांनीच आघाडीबाबत वाढविली धाकधूक...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com