
Sangali Political News: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठे महांकाळ या मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. सलग दोन निवडणुकात दोन पक्षातून पराभव झाल्यानंतर माजी खासदार संजय पाटील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागले आहे. बुधवारी झालेल्या मेळाव्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवून निवडणुकीच्या तोंडावर बॉम्ब फोडण्याची तयारी संजय पाटील गटाने ठेवली आहे.
कोणत्याही पक्षासोबत न जाता कार्यकर्ताच हा माझा पक्ष अशी भूमिका घेतल्यानंतर विकास आघाडीच्या माध्यमातून संजय काका पाटील हे महायुतीला जवळ करणार की महाविकास आघाडीशी जुळवून घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. त्यांच्या कोणत्याही एक भूमिकेमुळे मात्र जिल्ह्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पार्श्वभूमीवर मतदारसंघात राजकीय भूकंप होण्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर संजय काका पाटील यांनी अनेक पक्षातून मला पक्षात येण्यासंदर्भात विचारणा झाली आहे. मात्र सध्या कार्यकर्ता हाच माझा पक्ष असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीची भूमिका काय असणार यावर यावर दोन्ही तालुक्याचे राजकीय भवितव्य महत्त्वाचं आणि निर्णायक ठरणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर होणार आहे. तत्पूर्वीच मतदारसंघातील प्रबळ नेत्यांचा शोध घेऊन पक्षात खेचण्यासाठी आणि महायुती व आघाडीतील वर्चस्वासाठी इर्षा सुरू आहे. आजवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यात ज्याची सत्ता त्याला बऱ्यापैकी झुकते माप दिले जाते असेच चित्र आहे. त्यामुळे बहुतांश नेत्यांकडून नवा राजकीय भूकंप घडविण्यासाठी व रचना आखली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात नाट्यमय घडामोडी झाल्याचे दिसून येणार आहे.
बदलत्या राजकीय घडामोडीत आमदार रोहित पाटील आणि अजितराव घोरपडे यांची भूमिका देखील लक्षवेधी ठरणार आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर या दोन्ही तालुक्यातील जिल्हा परिषदेवर आमदार रोहित पाटील गटाचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व राखण्यासाठी संजय काका पाटील यांच्या विरोधात दोन हात करावे लागणार का? भाजप आणि शिवसेनेचा 'गेम' करण्यासाठी संजय काका पाटील यांची मदत घेणार का? का अन्य नेत्यांशी हात मिळवणी करणार? यावर अनेक समीकरण अवलंबून आहेत.
दुसरीकडे अनिता सगरे यांच्या गटाची भूमिका काय असणार हे देखील महत्त्वाचे आहे. महाकाली कारखान्याच्या अध्यक्ष अनिता सगरे आहेत. सध्या कारखान्याच्या विविध प्रश्नांमुळे सगरे गट भाजपच्या वाटेवर आहे. त्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतल्यास कवठेमहाकाळ तालुक्यात राजकीय भूकंप होऊन राजकारणाला वेगळे वळण येईल, असा अंदाज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.