
Mumbai News : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होत आहेत. दिवाळीनंतर या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे, त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे एकीकडे राज्यातील वातावरण तापले आहे. गेल्या चार महिन्यापासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज व उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत. मात्र राजकीयदृष्ट्या उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसे एकत्र कधी येणार व युतीची घोषणा कधी होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. गेल्या काही दिवसात ठाकरे बंधूंच्या गाठभेटी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे त्यांच्या भूमिकेविषयी काहीच भाष्य करीत नसल्याने त्यांच्या 'मौना'मागे नेमके काय दडलंय असा प्रश्न सतावत आहे. त्यासोबतच MVA सोबत गेल्या काही दिवसापासून त्यांची जवळीकता वाढली आहे ? त्यामुळे येत्या काळात ते काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. एवढेच नव्हे तर ते भाजपच्या प्रचार करताना सुद्धा दिसले. मात्र, त्या निवडणुकीत त्याचा राज ठाकरेंना अथवा भाजपला त्याचा काहीच फायदा झाला नाही. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी महायुती व महाविकास आघाडीशी समान अंतर ठेवत स्वबळावर निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. तर अमित ठाकरे यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही, अमित ठाकरे यांना सुद्धा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आता वर्षभरातच होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात काय भुमिका घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राज्यातील महायुती सरकारने चार महिन्यापूर्वी हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. त्याबाबत दोन जीआर काढले होते. मात्र त्याच मुद्द्यावरून राज व उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) हे एकत्र आले. त्यामुळे राज्य सरकारला हे दोन्ही जीआर रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या विरोधातील मोर्चा रद्द करून ठाकरे बंधूनी एकत्र येत वरळीत मोठा मेळावा घेतला. त्यानंतर दोन्ही बहू ऐकत आले आहेत. मात्र, अद्याप राजकीयदृष्ट्या उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसेनी युतीची घोषणा केली नाही. त्यामुळे येत्या काळात युतीची अधिकृत घोषणा कधी होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
गेल्या तीन महिन्यापासून राज ठाकरे त्यांची स्पष्ट भूमिका समाज माध्यमापुढे मानत नाहीत. त्यामुळे त्यांच्या या राजकीय 'मौना'मागे नेमके काय दडलंय याची चर्चा रंगली आहे. विशेषतः त्यांनी परप्रांतीय व उत्तर भारतीयांविरोधातील आक्रमकपणाचा मुद्दा बाजूला केला आहे. त्यामुळे उत्तर भारतीय मते भाजपकडे वळतील, असा अंदाज त्यांनी खोडून काढला आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्यामुळे भाजपला मदत होईल? अशा शक्यता टाळल्या आहेत.
गेल्या काही दिवसापासून त्यांची महाविकास आघाडीसोबतची त्यांची जवळीकता वाढताना दिसत आहे. काँग्रेसकडून बिहार निवडणुका तोंडावर असल्याने मनसेपासून सुरक्षित अंतर ठेवले जात आहे. त्यामुळेच त्यांनी परप्रांतीय नागरिकांसोबतची भूमिका आता सौम्य केली आहे. त्याशिवाय मुस्लिमविरोधी भूमिका देखील घेताना दिसत नाहीत. या सर्व कारणामुळेच गेल्या काही दिवसापासून राज ठाकरेंची आघाडीसोबतची वैचारिक जवळीकता वाढल्याचे दिसत आहे.
आगामी काळात होत असलेल्या बिहार निवडणुकीमुळे त्यांनी काही परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊन, असा प्रकार टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई महापालिका निवडणूक होत आहेत. त्यामुळे मनसेसोबत जाण्याचा काही परीणाम काँग्रेसला वाटत असला तरी बिहार निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल, असे सध्या तरी वाटत नाही.
त्यातच ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्या ठिकाणी ठाणे पॅटर्न उदयास येत आहे. याठिकाणी येत्या काळात काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसे एकत्रित येण्याची चर्चा सुरु आहे. याबाबत ठाण्यात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे गटाच्या नेत्यांसोबतच्या मनसेच्या बैठकीने या चर्चांना दुजोरा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजपच्या अडचणीत वाढ होणार आहे. MVA सोबत जर राज ठाकरे आले, तर थेट मराठी मते महायुतीकडून तुटण्याची भीती आहे. त्यामुळे येत्या काळात महायुतीला ताकही फुंकून प्यावे लागणार आहे.
गेल्या काही दिवसापासून भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना सातत्याने राज ठाकरेंना सोबत येण्याची विनंती करूनही त्यांनी महायुतीत येण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीच्या तयारीत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच गरज पडली तर MVA सोबतची जवळीकता वाढवून राज ठाकरे येत्या काळात एक मोठी राजकीय 'गुगली' टाकण्याच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या या रणनीतिक शांततेमुळे राज्यातील राजकारण कोणत्याही क्षणी धुमसण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.