आमदार जगतापांचं आरोग्यमंत्र्यांना साकडं; म्हणाले,गरीब बाळांसाठी एवढं कराच..

Laxman Jagtap : अनेक रुग्णालये पैशाची मागणी करतात...
Tanaji Sawant & Laxman Jagtap Latest News
Tanaji Sawant & Laxman Jagtap Latest NewsSarkarnama

पिंपरी : जन्मत: ऐकू न येणाऱ्या दोन वर्षापर्यंतच्या बाळांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व एडीआयपीअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठी दोन वर्षापर्यंतची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ती पाच वर्षांपर्यंत वाढवून राज्यातील या गरीब चिमुकल्यांना राज्य सरकारने दिलासा द्यावा, असे साकडे चिंचवडचे भाजप (BJP) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना घातले आहे. (Tanaji Sawant & Laxman Jagtap Latest News)

Tanaji Sawant & Laxman Jagtap Latest News
मंत्री महोदयांच्या उपचारादरम्यान पाच मिनिटं लाईट गेली अन् लगेच जनरेटर मंजूर झालं...

केंद्र व राज्य शासनाकडून जन्मत: ऐकू न येणाऱ्या बालकांसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व एडीआयपीच्या अंतर्गत कॉकलीअर इम्प्लांट (Cochlear Implant Surgery) सर्जरी केली जाते. तरीही त्यासाठी शासनानेच नेमून दिलेली अनेक रुग्णालये पैशाची मागणी करीत असल्याचे दाहक वास्तव असल्याचे आमदार जगताप यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबातील बाळे अशा उपचारापासून पैशाअभावी वंचित राहतात. वेळेत उपचार न झाल्याने वेळ निघून जाते व बालकाचे वय वाढत जाते. परिणामी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेनुसार दोन वर्षावरील मुलांवर अशा शस्त्रक्रिया होत नाहीत. त्यामुळे जन्मत ऐकू न येणारी राज्यातील दोन वर्षापेक्षा तीन महिने व चार महिने मोठे असलेली असंख्य बालके या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही,अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. म्हणून या योजनेच्या वयोमर्यादेत वाढ करावी,अशी लेखी मागणी त्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.

Tanaji Sawant & Laxman Jagtap Latest News
स्वतः मंत्री, लेक खासदार, दुसरी जि.प. अध्यक्ष...मात्र ही घराणेशाही नाही बरं!

तसेच केंद्र सरकार, जर एडीआयपीअंतर्गत पाच वर्षापर्यंतच्या बालकांसाठी ही मोफत शस्त्रक्रिया करण्याची योजना राबवत असेल, तर राज्य सरकारनेही त्याचा विचार करावा, असे ते म्हणाले. दरम्यान, याकरिता या योजनेची खेड्यापाड्यापर्यंत जागृती होण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली आहे. त्यासाठी तालुका स्तरावर मार्गदर्शन शिबिर राबविण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com