Bharat Jodo Nyay Yatra : न्याय यात्रेस उल्लेखनीय प्रतिसाद; केंद्राकडून अडथळे आणण्याचा प्रयत्न : औताडेंचा आरोप

Vilas Autade ठाणे शहरातही भारत जोडो न्याय यात्रा 16 मार्च रोजी पोहोचत असून, या यात्रेत सेवादल महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे विलास औताडे यांनी या वेळी स्पष्ट केले.
Ravindra Koli, Vilas Autade and other
Ravindra Koli, Vilas Autade and otherSarkarnama
Published on
Updated on

Thane Congress News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान विविध घटकांतील नागरिकांकडून मिळत असलेला उल्लेखनीय प्रतिसाद पाहूनच केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून या न्याय यात्रेला अडथळे आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष विलास औताडे यांनी मंगळवारी ठाण्यात केला.

ठाणे शहरात भारत जोडो न्याय यात्रा 16 मार्च रोजी पोहोचत असून, या यात्रेत सेवादल महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष विलास औताडे यांनी या वेळी स्पष्ट केले. ठाणे शहर (जिल्हा) सेवादल अध्यक्षपदी रवींद्र कोळी यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या पदग्रहण सोहळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष विलास औताडे यांच्या उपस्थितीत पार पडला.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल उपाध्यक्ष शेखर पाटील, शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, ओबीसी विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल उपाध्यक्ष प्रकाश पेवेकर, प्रदेश महिला सेवादल अध्यक्ष सविता जाधव, प्रकाश भांगरत, सुखदेव घोलप, जे. बी. यादव, शैलेश शिंदे, स्मिता वैती, संदीप शिंदे आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravindra Koli, Vilas Autade and other
Rahul Gandhi : भाजप कार्यकर्त्यांनी चक्क बटाटे भेट, राहुल गांधींचेही हटके उत्तर; म्हणाले...

या वेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे (Manoj Shinde) यांनी सांगितले की, रवींद्र कोळी यांच्यासारख्या अनुभवी कार्यकर्त्यांवर सेवादल काँग्रेसची जबाबदारी दिल्यामुळे काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी आली आहे. याचा प्रत्यय लवकरच आपल्या समोर दिसेल, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com