MNS Vs CBSE Board : शिवजयंती दिवशीच 'सीबीएसई' बोर्डाचा संस्कृतचा पेपर; मनसे विद्यार्थी सेनेने दिला 'हा' इशारा...

Demand that managers should be ordered to cancel the paper : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे तक्रार
MNS
MNSSarkarnama
Published on
Updated on

Thane News : येत्या 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती असून, या दिवशी छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस संपूर्ण जगात उत्साहाने साजरा केला जातो. तसेच शासकीय सुट्टी असतानासुद्धा 'सीबीएसई' बोर्डाने त्यांच्या वेळापत्रकात त्या दिवशी संस्कृत विषयाचा पेपर जाणीवपूर्वक नियोजित केला आहे. महाराष्ट्राच्या दैवताचा यातून अपमान केला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला.

त्यामुळे आक्रमक झालेल्या मनविसेनेने याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे तक्रारही केली आहे. त्यामध्ये त्या दिवशी होणारा पेपर रद्द करावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना त्या दिवशी परीक्षा होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला असून, तत्काळ सीबीएसई बोर्डाच्या व्यवस्थापकांना पेपर रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

MNS
Ashok Chavan : 'या' नेत्यांच्या विरोधामुळेच चव्हाणांचा मंत्रिपदाचा पत्ता कट; खासदारकीवर बोळवण

मनविसेच्या तक्रारीकडे राज्य सरकार कसे बघते आणि काय निर्णय देते तेच पाहावे लागणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने (सीबीएसई) बोर्डाची सेकेंड्री आणि सीनियर सेकेंड्रीची वार्षिक परीक्षा 15 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू होत आहे, तर ही परीक्षा 2 एप्रिलपर्यंत चालणार आहे. परंतु 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिवशीच सीबीएसई बोर्डाने संस्कृत विषयाचा पेपर ठेवला आहे, अशी तक्रार काही पालकांनी मनसेकडे केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. महाराष्ट्र शासनाने अधिकृत सुट्टी जाहीर केली असताना सीबीएसई बोर्डाने राज्यातील शिक्षण विभागाशी समन्वय साधणे आवश्यक होते. शिवजयंतीच्या दिवशी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या गौरवशाली, पराक्रमी इतिहासाची माहिती दिली गेली पाहिजे. सर्व शाळांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली पाहिजे.

मात्र, सीबीएसई बोर्ड महाराष्ट्राच्या दैवताचा जाणीवपूर्वक अपमान करत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने 19 फेब्रुवारीचा संस्कृत विषयाचा पेपर रद्द न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या दिवशी परीक्षा होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला असून, तत्काळ सीबीएसई बोर्डाच्या व्यवस्थापकांना परीक्षा रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी केली आहे.

(Edited by Amol Sutar)

R

MNS
Ashok Chavan Resignation : चव्हाणांच्या राजीनाम्यावर निरुपमांचा खुलासा; म्हणाले, 'वरिष्ठांनी गांभीर्याने...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com