Ashok Chavan Resignation : चव्हाणांच्या राजीनाम्यावर निरुपमांचा खुलासा; म्हणाले, 'वरिष्ठांनी गांभीर्याने...'

Sanjay Nirupam tweeted the reason : पक्षातीलच एका नेत्याला जबाबदार धरत त्यांनी पक्षातील वरिष्ठांनी केलेले दुर्लक्ष सांगितले.
Ashok Chavan, Sanjay Nirupam
Ashok Chavan, Sanjay NirupamSarkarnama

Maharashtra politics : मुंबईतील काँग्रेसचे नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर ट्विट केले आहे. यातून त्यांनी काँग्रेस पक्षातील नेते आणि वरिष्ठांमध्ये असलेली नाराजी उघड केली आहे. पक्षातीलच एका नेत्याला यासाठी जबाबदार धरत त्यांनी पक्षातील वरिष्ठांनी केलेले दुर्लक्ष सांगितले आहे.

आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला 'हात' दाखवत आपला राजीनामा सादर केला. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फुटले. पण आता काँग्रेसचे नेते भाजपच्या वाटेवर असल्याने खळबळ उडाली आहे. यातून भाजपने मोठा डाव साधल्याची चर्चा आहे. असे असताना मात्र काँग्रेसचे नेते माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी राजीनाम्यामागील सत्य उघड केले आहे.

Ashok Chavan, Sanjay Nirupam
Ashok Chavan Resignation : सर्व्हेतील काँग्रेसच्या यशामुळे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न; सतेज पाटलांचा भाजपवर रोख

निरुपम यांनी आज चव्हाण यांच्या राजीनाम्यावर एक्स हॅन्डलवर ट्विट करत सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, "अशोक चव्हाण हे पक्षासाठी निश्चितच संपत्ती होते. कोणी त्याला उत्तरदायित्व म्हणत आहेत. कोणी ईडीला जबाबदार धरत आहेत, ही सर्व उतावीळ प्रतिक्रिया आहे. मुळात महाराष्ट्रातील एका नेत्याच्या कार्यशैलीवर ते खूप नाराज होते. याची माहिती त्यांनी वेळोवेळी वरिष्ठ नेतृत्वाला दिली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती. अशोक चव्हाण हे साधनसंपन्न, कुशल संघटक, जमिनीवर पक्की पकड असलेले आणि गंभीर नेते आहेत. गेल्या वर्षी जेव्हा भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये पाच दिवसांची होती, तेव्हा संपूर्ण नेतृत्वाने त्यांची क्षमता प्रत्यक्ष पाहिली होती. त्यांचे काँग्रेस सोडणे हे आमचे मोठे नुकसान आहे. त्याची भरपाई कोणीही करू शकणार नाही.

त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी फक्त आमचीच होती", असे संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, यातून पक्षात नेत्यांमध्ये असलेली नाराजी आणि वरिष्ठ पातळीवर केले जाणारे दुर्लक्ष समोर आले आहे. आता चव्हाणांपाठोपाठ कोण कोण काँग्रेसला राम राम करतंय हे येणारा काळ ठरवेल.

R

Ashok Chavan, Sanjay Nirupam
Kolhapur News : महाडिक अन् पाटील कार्यकर्ते सोशल मीडियावर भिडले, इकडं युवा नेत्यांनी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com