Jitendra Awhad : बोरीवली - ठाणे रस्ता म्हणजे पैसे खाण्याचे कुरण; आव्हाडांचा सरकारवर गंभीर आरोप

Corruption in Borivali - Thane road work : जणू काही या रस्त्याला सोन्याचा मुलामाच लावणार, ट्विट करत सत्ताधाऱ्यांवर साधला निशाणा. रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याचीही केली मागणी.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Thane News : बोरीवली - ठाणे हा रस्ता म्हणजे फक्त पैसे खाण्याचे कुरण आहे. 'बाँड के बदले मे कॉन्ट्रॅक्ट', असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे केला आहे. जणू काही या रस्त्याला सोन्याचा मुलामाच लावणार आहेत, असेही त्यांनी नमूद करत त्या रस्त्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही केली आहे.

बोरीवली (Borivali) ते ठाणे हा डोंगराच्या आतून रस्ता काढण्याचे कॉन्ट्रॅक्ट मेघा इंजिनियरिंग या कंपनीला देण्यात आले आहे. तसेच त्या कॉन्ट्रॅक्टची किंमत 14 हजार 400 कोटी रुपयांची होती. त्या बदल्यात मेघा इंजिनियरिंगने 940 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड विकत घेतले. भ्रष्टाचाराचा हा सोपा मार्ग झाला आहे, असेही जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Jitendra Awhad
Kolhapur Lok Sabha Election 2024 : शाहू महाराज विरुद्ध समरजीत घाटगे सामना होणार? महाडिकांनी दिले संकेत!

कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असेल तर बाँड विकत घ्या, हे सरळ गणित या सरकारने मांडल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे, तर बोरीवली ते ठाणे या रस्त्याच्या एका किलोमीटरची किंमत ही जगात कोणीही देत नसेल एवढी आहे. जणू काही या रस्त्याला सोन्याचा मुलामाच लावणार आहेत, असेही त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बोरीवली ते ठाणे रस्त्याची जर चौकशी केली तर किलोमीटरमागे लावलेली किंमत आणि खरी किंमत यांच्यात प्रचंड तफावत आहे, हे स्पष्ट होईल. त्यासाठी त्यांनी 940 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड (Electoral Bond) खरेदी केले. म्हणजेच जवळपास कॉन्ट्रॅक्टच्या रकमेच्या दहा टक्के बाँड मेघा इंजिनियरिंगने विकत घेतले. या रस्त्याची चौकशी व्हायला हवी, असे नमूद करताना हा रस्ता म्हणजे फक्त पैसे खाण्याचे कुरण आहे. 'बाँड के बदले मे कॉन्ट्रॅक्ट' असेही शेवटी ते म्हटले आहे.

(Edited by Amol Sutar)

R

Jitendra Awhad
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ यांनी फेटाळला अभिषेक सिंघवी यांचा 'तो' दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com