Thackeray Group: ठाकरे गटाला मुंबईत धक्का; पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

Shivsena : बोरिवली आणि कांदिवलीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का
Shivsena Thackeray Group
Shivsena Thackeray GroupSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिकांच्या निवडणुका पाहता राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी सध्या नेते मंडळींच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. मात्र, असे असतानाच शिवसनेच्या ठाकरे गटाला धक्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील माजी नगरसेवकांसह शेकडो शिवसैनिकांनी ठाकरेंची साथ सोडली होती. यानंतर आता बोरिवली आणि कांदिवलीमध्ये ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

मुंबईतील बोरिवली आणि कांदिवलीमधील शिवसेना ठाकरे गटाचे महाराष्ट्र सहसचिव राजू नालीन आणि मुंबई समन्वयक विकी मोकल यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यांच्याबरोबरच शेकडो शिवसैनिकांनीही शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेचे (शिंदे गट) नेते रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली राजू नालीन आणि विकी मोकल यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश रामदास कदम यांच्या निवासस्थानी करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivsena Thackeray Group
Uddhav Thackeray: विमानात बिघाड, उद्धव ठाकरेंचा नांदेड दौरा रद्द ; मराठा आंदोलकांनी बैठक उधळली...

काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईतील घाटकोपर भटवाडी येथील माजी नगरसेवक दीपक हांडे आणि माजी नगरसेविका अश्विनी हांडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर घाटकोपरमध्ये ठाकरे गटाला धक्का बसला होता. त्यानंतर लातूर जिल्ह्यातही ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं.

गटाचे लातूर माजी जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवल्यामुळे ते नाराज झाल्याचे बोलले जात होते. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करत ते आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे लातूरमध्येही ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. आता मुंबईतील बोरिवली आणि कांदिवलीमधील पक्षाचे महाराष्ट्र सहसचिव राजू नालीन आणि मुंबई समन्वयक विकी मोकल यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला.

(Edited by- Ganesh Thombare)

Shivsena Thackeray Group
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सरकार दरबारी हालचालींना वेग; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com