Vasant More : मनसेने दुसऱ्याला उमेदवारी दिली तर...; वसंत मोरेंचे मोठं विधान

Pune MNS : जनता दरबार आणि बॅनरबाजीतून मोरेंची लोकसभेसाठी तयारी जोरात
Vasant More
Vasant MoreSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असून, त्याबाबत त्यांनी पक्ष अध्यक्ष राज ठाकरेंना कळवले आहे. यातच शहरातील अनेक नेत्यांनीही तयारी सुरू केली आहे. यातच शर्मिला ठाकरे यांनी 'साईनाथ बाबर दिल्लीत गेले, तर दुधात साखर पडेल,' असे वक्तव्य केल्याने मोरेंचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर मोरेंनीही, 'कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच,' असे म्हणत 'मी पट्टीचा गारुडी आहे,' असे स्टेटस ठेवत सूचक विधान केले होते. या पार्श्वभूमीवर मोरेंनी 'सरकारनामा'शी बोलताना राज ठाकरेंचे नाव मोठं विधान केले आहे.

मनसे पुण्यातून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. त्यासाठी वसंत मोरे (Vasant More) , साईनाथ बाबर, बाबू बागसकर आदी नेते इच्छुक आहेत. त्यातच काही पदाधिकाऱ्यांनी बाहेरचा म्हणजे एनजीओ, माजी अधिकारी अशा चेहऱ्यांना संधी दिली तर फायदा होईल, असे राज यांच्याकडे सूचना केली आहे. वसंत मोरे चांगलेच चिडले होते. ते म्हणाले, 'बाहेरच्या किती लोकांना आयात करणार तुम्ही. आम्ही २० वर्षांपासून काम करतोय. राज ठाकरेंनी या गोष्टी बोलल्या असत्या तर मान्य केले असते. मात्र, त्यांच्यापर्यंत चुकीच्या गोष्टी पोहोचवणार असाल तर मी ते सहन करणार नाही,' असेही त्यांनी स्पष्ट मत मांडले.

Vasant More
Raj Thackeray : PM मोदी बाळासाहेबांना भारतरत्न देणार का? राज ठाकरेंची पोस्ट अन् नव्या चर्चेला तोंड फुटणार...

मी लोकांसाठी दिवसरात्र खपतोय. मात्र, आता मला खच्चीकरणासाठी चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. माझा जनता दरबार पाहवा. माझे काम पाहवे. माझे २४ तास काम सुरू आहे. मी अनेक गोष्टी अंगावर घेतो, ग्राउंडवर काम करतो, मग चुकीच्या गोष्टी का पेरल्या जातात. मनसेची ब्लू प्रिंट राबवणारा एकमेव नगरसेवक आहे. मी कुठे कमी आहे ते सांगा तेही मी करतो. असे असताना बाहेरचा उमेदवार कशाला? सक्षम असताना मला का पर्याय शोधला जातोय?, असे प्रश्नही मोरेंनी उपस्थित केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज यांच्या आदेशाकडे लक्ष

दरम्यान, सोशल मीडियावरील झालेल्या गैरसमजातून मोरेंनी राज यांना इशारा दिल्याचीही चर्चा झाली. यावर त्यांनी मी राज ठाकरेंएवढा मोठा नसून त्यांचा शब्द पाळणारा कार्यकर्ता असल्याचेही स्पष्ट केले. वसंत मोरेंनी लोकसभा मैदानात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांनी सध्या जनता दरबार सुरू केलेला आहे. शहरभर 'पुण्याची पसंत मोरे वसंत' अशी बॅनरबाजी केली आहे. आता ते फक्त राज ठाकरेंच्या (Raj Thackrey) आदेशाची वाट पाहत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Vasant More
Abhishek Ghosalkar Shot Dead : गोळ्या सुटताहेत....धमक्या घुमताहेत! लोक म्हणताहेत.... 'हम जायें तो जाये कहां ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com