Loksabha Election 2024 : ठाण्यात गद्दार विरुद्ध निष्ठावंत असा सामना रंगणार : राजन विचारेंनी स्पष्टच सांगितलं

Rajan Vichare खासदार राजन विचारे हे तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यापूर्वी ते चार वेळा नगरसेवक म्हणून महापालिकेत निवडून गेले आहेत.
Udhav Thackeray, Rajan Vichare
Udhav Thackeray, Rajan Vicharesarkarnama
Published on
Updated on

-पंकज रोडेकर

Thane News : शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर झालेल्या यादीत ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात विद्यमान खासदार राजन विचारे हेच उमेदवार असणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना, खासदार विचारे यांनी ही निवडणूक यासाठी प्रतिष्ठेची आहे. ज्या ठाण्यामधून पहिली गद्दारी झाली होती. तीच गद्दारी आता दुसऱ्यांदा झाली. त्यामुळे गद्दार विरुद्ध निष्ठावंत हा असा सामना होणार आहे, त्यांनी स्पष्ट केले आहे.

खासदार राजन विचारे हे तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यापूर्वी ते चार वेळा नगरसेवक म्हणून महापालिकेत निवडून गेले आहेत. त्यांनी सभागृह नेत्यांपासून महापौर पदापर्यंत मजल मारली, तर एक वेळ आमदार म्हणून ही निवडून आले. त्यानंतर सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून गेले आहेत.

तर शिवसेना फुटीनंतर ते ठाकरे गटासोबत कायम राहिले. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर ठाकरे गटाने विश्वास टाकत तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना सच्चा शिवसैनिकांचा विजय होणार; बालेकिल्ला खऱ्या शिवसेनेचाच राहणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

Udhav Thackeray, Rajan Vichare
Thane News : तुम्ही महायुतीचा धर्म तोडणार, मग आम्ही का पाळावा? शिवतारेंच्या मुद्द्यावरून परांजपेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा...

सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे साहेब यांनी तिसऱ्यांदा मला खासदार म्हणून संधी दिली. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार विचारे यांनी पहिली सत्ता ज्या ठाण्याने शिवसेनेला दिली आणि या ठाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल जी विकासाची कामे ठाण्यामध्ये झाली त्याच जोरावर ही निवडणूक होणार आहे. ही निवडणूक यासाठी प्रतिष्ठेची आहे की, ज्या ठाण्यामधून पहिली गद्दारी झाली होती. तीच गद्दारी आता दुसऱ्यांदा झाली. गद्दार विरुद्ध निष्ठावंत हा असा सामना होणार आहे आणि निश्चितच जनता योग्य तो न्याय देईल, असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Udhav Thackeray, Rajan Vichare
Rajan Vichare : ठाण्यात ठाकरेंचा उमेदवार जाहीर, महायुतीत अजून 'विचार' सुरूच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com