Police Officer Transfer: मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारणं भोवलं? मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तांची बदली

Police Officer Transfer: मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागानं आजच यासंदर्भातील बदलीचा आदेश काढला आहे.
Officers Transfer Orders : EKanath Shinde : Devendra Fadnavis
Officers Transfer Orders : EKanath Shinde : Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Police Officer Transfer: ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर शहरात निघालेल्या मराठी जनतेच्या मोर्चाला परवानगी नाकारणारे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली करण्यात आली आहे. मनसे आणि मराठी एकीकरण समितीनं काढलेल्या या मोर्चाला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली त्यानंतर शेकडो लोक रस्त्यावर उतल्यानंतर या मोर्चाची दडपशाही करण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. यामुळं मराठी लोकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. यापार्श्वभूमीवर सरकारनं घेतलेल्या या बदलीच्या निर्णयाची सध्या चर्चा सुरु आहे.

Officers Transfer Orders : EKanath Shinde : Devendra Fadnavis
Avinash Jadhav: मोदी सत्तेत आल्यानंतरच महाराष्ट्रात मराठीची गळचेपी सुरु झाली! मनसेच्या अविनाश जाधवांनी सांगितली क्रोनॉलॉजी

मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागानं आजच यासंदर्भातील बदलीचा आदेश काढला आहे. त्यांच्या जागी लाचलुचपत विभागाचे अपर पोलीस महासंचालक निकेत कौशिक यांची मिरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर या शहराचे पोलीस आयुक्त असलेले मधुकर पांडे यांची अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

IPS Transfer
IPS Transfer

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com