
Avinash Jadhav: मुंबईत हिंदी भाषिकांच्या दादागिरीला नेमकं कोण जबाबदार आहे? महाराष्ट्रातील नेतेच याला जबाबदार आहेत का? की आणखी काही कारण यामागे आहे. या प्रश्नावर उत्तर देताना मोदींची केंद्रात सत्ता आल्यानंतरच ही दादागिरी वाढली असल्याचं स्पष्ट मत मनसेचे नेते अविनाथ जाधव यांनी व्यक्त केलं आहे. साम टीव्हीच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' या मुलाखतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
अविनाश जाधव म्हणाले, "हिंदी भाषिकांचं प्रस्थ मुंबईत वाढलं हे आपल्या मराठी राजकारण्यांमुळेच, पण त्यांची दादागिरी वाढली ही २०१४ नंतर. २०१४ मध्ये भाजपाचं सरकार आल्यानंतर हे प्रमाणं खूप वाढलं. 2006 ते 2012 हा कालखंड पाहिला तर यावेळी महाराष्ट्रात मराठीच चालत होती. राज ठाकरेंनी या काळात मराठीचा मुद्दा हातात घेतला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र त्यावेळी एकवटला होता. त्यावेळी मनसेला चांगलं यशही आलं होतं. या यशाच्या मागचं कारण होतं मराठी माणसाची एकजूट. ही एकजूट २०१४ ला हिंदुत्वाकडं गेली. मोदींचं सरकार आलं त्यानंतर बाहेरुन आलेल्या लोकांचं आमच्यावरच वर्चस्व वाढणं सुरु झालं"
यानंतर महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, मराठी येत नाही अशा सगळ्या गोष्टी समोर यायला लागल्या. त्यानंतर मागच्या एक ते दीड वर्षात याची मराठी माणसामध्ये चीड निर्माण व्हायला लागली. आमच्या राज्यात जर रिक्षानं जाताना एखादा रिक्षावाला म्हणतो की, आपको हिंदी मे बात करना पडेगा, त्यानंतर दुकानात गेल्यानंतर दुकानदार म्हणतो की आपको हिंदी मे बात करना पडेगा. हमे मराठी आती नहीं. मग या गोष्टी सतत यायला लागल्यानं हा राग निर्माण व्हायला लागला. त्यानंतर अनेक गोष्टी सरकार मराठी भाषिकांवर लादायला लागलं.
दरम्यान, २०१४ रोजी मोदींना मनसेनं पाठिंबा दिला होता. पण आम्हाला हे माहिती नव्हतं की, या सर्व गोष्टी करण्यासाठी ते येत आहेत. म्हणजे आमच्या घरात राहून आम्हालाच चोरी होणार आहे हे आम्हाला आत्ता आत्ता कळायला लागलं. कुठल्या दिशेनं हे जातं आहे हे आम्हाला आत्ता कळायला लागलं. म्हणजेच आमच्या कंपन्या गेल्या, आमच्या नोकऱ्या गेल्या, आमची बंदरं गेली, आमच्या सर्व गोष्टी बाहेर जायला लागल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.