Thane News: ठाणे महापालिकेच्या आयुक्तांची आरेरावी, एसआरए रहिवाशाला धमकी; जितेंद्र आव्हाडांसमोरच राडा

नळपाडा येथील रहिवाशांनी झोपडपट्टी बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सर्व्हेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे, तरी दुसरीकडे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर एकच चर्चेचा उधाण आलं आहे.
NCP leader Jitendra Awhad
NCP leader Jitendra Awhad Sarkarnama
Published on
Updated on

Thane News: नळपाडा येथील रहिवाशांनी झोपडपट्टी बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सर्व्हेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असली तरी, दुसरीकडे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर एकच चर्चेचा उधान आले आहे. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा झोपटपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी आणि स्थानिक रहिवाशी यांच्यात बाचाबाची झाल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच माळवी यांनी थेट गुन्हा दाखल करण्याचा इशार दिला. हा सर्व प्रकार शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समोर घडला. यावेळी आव्हाड यांनी देखील हस्तक्षेप करीत गुन्ह्याला कोण घाबरतो असे सांगत असल्याचे दिसून येत आहे.

NCP leader Jitendra Awhad
Maharashtra Floods: आपली माती, आपला माणूस....! आमदार कैलास पाटील यांचं सर्व पक्षीय नेत्यांना भावनिक आवाहन

नळपाडा लोकवस्तीत बायोमेट्रिक सर्वेक्षणाविरोधात नागरिकांनी तीव्र आंदोलन उभारले. ३०० हून अधिक नागरिकांनी ठाणे झोपडपट्टी प्राधिकरणाच्या (एसआरए) कार्यालयावर मोर्चा काढून सर्वेक्षणास तीन महिन्यांची स्थगिती द्यावी, अशी मागणी केली. तसेच शरद पवार गटाचे आमदार आव्हाड यांनी देखील या आंदोलनाला पाठींबा दिला होता. त्यानंतर गुरुवारी येथील रहिवासी आणि आव्हाड यांच्या उपस्थितीत एसआरए अधिकाºयांची बैठक झाली. या बैठकीत आव्हाड यांच्यासह रहिवाशांनी या सर्व्हेला विरोध करीत स्थगितीची मागणी लावून धरल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्यात सर्व्हेला स्थगिती देत असल्याचे एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी जाहीर केले.

NCP leader Jitendra Awhad
Maharashtra Floods: सावधान! आजही पाऊस मुसळधार कोसळणार; तब्बल 31 जिल्ह्यांना यलो अलर्ट

या संदर्भातील नोटीस देखील काढण्यात आली. असे असले तरी, दुसरीकडे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, आमदार जितेंद्र आव्हाड आणि नळपाडा येथील रहिवाशांची बैठकित आव्हाड म्हणाले आम्ही बायोमॅट्रिक करु देणार नाही. त्यावर माळवी म्हणाले बायोमॅट्रिकला थांबविण्याचा प्रश्नच नाही. आव्हाड यांनी येथे सोसायटी बोगस असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर रहिवाशांनीही माळवी यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावरून वाद वाढू लागला. माझ्याशी नीट बोलायचे असे माळवी म्हणाल्यानंतर नागरिकापैकी एकजण आक्रमक झाला. ही बाचाबाची वाढल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

NCP leader Jitendra Awhad
Marathwada Floods: राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार का? शंभुराज देसाईंनी दिली महत्वाची अपडेट

माळवी यांनी थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. त्यावर गुन्हा दाखल करा असे रहिवासी म्हणाले. त्यानंतर पोलिसांना बोलविण्याची सूचना माळवी यांनी केली. आव्हाड यांनी दोघांनाही शांत राहण्याची सूचना केली. माळवी यांनी गुन्हा दाखल करण्याचा पुनरुच्चार करताच, गुन्ह्याला कोण घाबरतो असे आव्हाड म्हणाले. काहीवेळ वाद झाल्यानंतर ही बैठक संपली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com