Thane Municipal Election: प्रशांत जगताप यांच्यानंतर नाराजीचा पुढचा नंबर जितेंद्र आव्हाडांचा? ठाण्यातही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाचे वारे

Thane NCP Alliance : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार व शरद पवार गट एकत्र येण्याचे संकेत मिळत असून, प्रस्ताव आल्यास तो वरिष्ठांकडे पाठवला जाणार आहे.
NCP leaders addressing media in Thane amid growing speculation over a possible alliance between Ajit Pawar and Sharad Pawar factions ahead of the municipal corporation elections.
NCP leaders addressing media in Thane amid growing speculation over a possible alliance between Ajit Pawar and Sharad Pawar factions ahead of the municipal corporation elections.Sarkarnama
Published on
Updated on

Thane Election News : पुण्याप्रमाणे ठाणे महापलिका निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आमचे विरोधक नसल्याचे स्पष्ट करीत ठाणे शहरात पक्ष विस्तारासाठी सर्व पर्यायांचा विचार करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी सांगितले. 30 तारखेपर्यंत कोणताही प्रस्ताव आल्यास तो पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठवून त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

नजीब मुल्ला यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांना निवडून आणणे आणि पक्ष संघटना मजबूत करणे हेच अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यासह इतर महापालिकांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गट शिवसेना आणि भाजप युती करून निवडणूक लढवत आहेत. मात्र ठाण्यात अजित पवार यांना युतीकडून चर्चेसाठीही निमंत्रण न मिळाल्याने हा गट स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.

राबोडी, कळवा आणि मुंब्रा या भागांवर लक्ष केंद्रित करून पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता होती. दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठाण्यात वर्चस्व असले, तरी जागावाटपाबाबत उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसेने कठोर भूमिका घेतल्याने या गटात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.

NCP leaders addressing media in Thane amid growing speculation over a possible alliance between Ajit Pawar and Sharad Pawar factions ahead of the municipal corporation elections.
Pune municipal election : भाजपसोबत चर्चा, पण जागावाटपात दगाफटका झालाच तर..., पुण्यासाठी शिवसेनेचा प्लॅन बी तयार ?

नवी राजकीय समीकरणे

दरम्यान, या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र येण्याबाबत केलेल्या आवाहनामुळे नव्या राजकीय शक्यता निर्माण झाल्या आहेत. कार्यकर्त्यांना निवडून आणणे आणि पक्षाची ताकद वाढवणे हेच अंतिम उद्दिष्ट असल्याचे नजीब मुल्ला यांनी स्पष्ट केल्याने शरद पवार गटाची भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे. ठाण्याच्या राजकारणात येत्या काळात महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

NCP leaders addressing media in Thane amid growing speculation over a possible alliance between Ajit Pawar and Sharad Pawar factions ahead of the municipal corporation elections.
PMC Election : पुण्यातील भाजप-शिवसेना युतीवर मुंबईत शिक्कामोर्तब? CM फडणवीस अन् उदय सामंतांनी फिरवला अंतिम हात; गणेश बिडकरांची पोस्ट चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनीही या चर्चांना दुजोरा दिला. ते म्हणाले, अजित पवार गट आमचा दुश्मन नाही, परंतु याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. निवडणुकीआधी एकत्र यायचे की नंतर हेही पाहिले जाईल. मात्र निवडणुकीपूर्वी एकत्र आलो तर पक्षाची ताकद दिसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पण यावर आता अजित पवार यांच्याशी न पटणारे आमदार जितेंद्र आव्हाड काय भूमिका घेणार? ते या प्रस्तावाला मंजुरी देणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com