Thane Politics : गणेश नाईकांनी जुने नेटवर्क पुन्हा अॅक्टिव्ह केलं; प्रताप सरनाईकांना त्यांच्या मतदारसंघात चॅलेंज!

Thane Politics : गणेश नाईक यांनी मिरा-भाईंदरमध्ये जनता दरबार घेऊन जुने नेटवर्क सक्रिय केले असून शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत चुरस वाढली आहे.
Ganesh Naik, Pratap Sarnaik  Thane Politics
Ganesh Naik, Pratap Sarnaik Thane PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Ganesh Naik Vs Eknath Shinde : नवी मुंबई, ठाणे शहरानंतर गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे या वादाचे लोण मिरा-भाईंदरपर्यंत पोहोचले आहे. वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी नुकताच मिरा भाईंदर शहात जनता दरबार घेतला. भाजपने नाईक यांची ठाणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे, त्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच जनता दरबार होता. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही घडामोड अत्यंत महत्वाची मानली जाते.

खरंतर मिरा-भाईंदर शहर ठाणे जिल्ह्यात येते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत, मात्र शिंदे यांचा एकही जनता दरबार अद्याप मिरा-भाईंदरमध्ये झालेला नाही. शिवाय शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातही शहराचा काही भाग येतो. पण त्यांच्याची जनता दरबारची कधी नाही. असे असताना, भाजपने पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार येथे घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

जानेवारी महिन्यात मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यात युती होणार की नाही, याबाबत अजूनही साशंकता आहे. युती न होण्याची शक्यता गृहित धरून दोन्ही पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मागील निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते आणि भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले होते. त्यामुळे यावेळीही शिवसेनेशी युती नको, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे.

Ganesh Naik, Pratap Sarnaik  Thane Politics
Thane Politics : अमित शहांचे एकनाथभाईंकडे साफ दुर्लक्ष; भाजप ठाण्यातच पुन्हा धमाका करण्याच्या तयारीत

नाईकांच्या जनसंपर्काचा फायदा :

मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी मिरा-भाईंदरचा समावेश तत्कालीन बेलापूर विधानसभा मतदारसंघात होता, ज्याचे प्रतिनिधित्व गणेश नाईक करत होते. त्यामुळे मिरा-भाईंदरमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. युती तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात नाईक हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तेव्हा त्यांनी येथे नियमितपणे जनता दरबार घेतले होते आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. आता या जनता दरबारच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे जुने नेटवर्क अॅक्टिव्ह केले आहे.

Ganesh Naik, Pratap Sarnaik  Thane Politics
Eknath Shinde यांच्या Thane मध्ये BJP बाजी मारणार ? Jaykumar Gore काय म्हणाले पाहा | Devendra Fadnavis |

सरनाईक यांचा प्रभाव :

सध्या विधानसभेत मिरा भाईंदरचे प्रतिनिधित्व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता हे दोघेही करत आहेत. प्रताप सरनाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याने सरनाईक यांनी शहरात आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यांनी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी विकासकामांसाठी मंजूर करवून आणला आहे, ज्याचा प्रभाव निवडणुकीत जाणवण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com