Jayant Patil, Anand Paranjpe sarkarnama
ठाणे

Loksabha Election 2024 : जयंत पाटलांची शोलेतील असरानीसारखी अवस्था होणार : आनंद परांजपे यांची टीका

Narendra Modi राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका होती की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी महायुतीचे ४५ प्लस खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले पाहिजेत.

Pankaj Rodekar

Thane News : विजय शिवतारेप्रकरणी ‘अंत भला तो सब भला’ असे उद॒गार काढत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यावेळी 'सळो की पळो' स्थिती झालेली जयंत पाटील यांना दिसेल, असे मत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सोमवारी ठाण्यात व्यक्त केले. जयंत पाटील यांची अवस्था शोले पिक्चरमधील जेलर असरानीसारखी होऊ नये, म्हणजे 'आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ...'अशा सदिच्छा परांजपे यांनी दिल्या आहेत.

आनंद परांजपे म्हणाले, विजय शिवतारे यांची समजूत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार यांनी काढली. यानंतर शिवतारे यांनी बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्राताई अजित पवार यांना संपूर्ण पाठिंबा घोषित केला आणि पुरंदरमधून दीड लाखांचे मताधिक्य देऊ अशाप्रकारचा विश्वास विजय शिवतारे यांनी तिन्ही नेत्यांना दिला. त्यामुळे विजय शिवतारे आता महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार बारामती लोकसभेमध्ये जोरात करतील.

मला विश्वास होता की, राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीतील तिन्ही नेते हे विजय शिवतारे यांना एकत्रितरीत्या घेऊन बसले, त्यांच्याही काही अडचणी होत्या त्या त्यांनी समजून घेतल्या. त्यामुळे ‘अंत भला तो सब भला’. राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका होती की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी महायुतीचे ४५ प्लस खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले पाहिजेत.

पण, ज्यावेळेला विजय शिवतारे Vijay Shivtare यांनी राष्ट्रवादीच्या स्वाभिमानावर आघात केला, त्यावेळी राष्ट्रवादीचा एक जिल्हाध्यक्ष म्हणून, राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून ती माझी एक नैसर्गिक स्वाभाविक प्रतिक्रिया होती. आता जसे विजय शिवतारे हे महायुतीचे काम करणार आहेत, तसे आम्हीदेखील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी होण्यासाठी कामाला लागलो आहोत.

महाराष्ट्रातील चार, पाच जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तीनही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. या जागांवर लवकरात लवकर योग्य तो तोडगा निघेल, असे परांजपे म्हणाले. नीलेश लंके यांना पहिल्यापासून लोकसभा लढवायची होती, अजितदादा पवार यांनी अनेकदा त्यांची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आपल्या मतदारसंघाबाहेर पाच विधानसभा आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिथून मते मिळविणे कठीण जाईल आणि भाजप विद्यमान खासदार सुजय विखे तिथे असल्यामुळे राष्ट्रवादी ती जागा मागू शकत नाही. पण, त्यांना लोकसभा लढायची होती, त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. ज्यावेळी चार जूनला मतदान होईल, तेव्हा आपल्याला काय निकाल लागेल हे कळेल, असेही परांजपे यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT