Manse News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील तिन्ही पक्षांत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असून, एकमेकांना आव्हान देण्यापर्यंत मजल गेली आहे. यावर मनसेच्या आमदार राजू पाटील यांनी सूचक विधान करत महायुतीच्या नेत्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, लोकसभा निवडणुका हा तर ट्रेलर आहे. विधानसभेत तुम्ही पहा अजून भाई उतरतील, असे म्हणत त्यांनी महायुतीतील नेत्यांना टार्गेट केले आहे.
लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून, येत्या काही दिवसांतच आचारसंहिताही लागणार आहे. पण, सध्या जागावाटपावरून महायुतीतील मित्रपक्षांचा ताळमेळ बसलेला नाही. जागावाटपावरून तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. त्यातच भाजप नेत्यांना शिंदे गट शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आमचा केसाने गळा कापू नका, असा इशारा दिला आहे. यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
मोदी, शाहांकडे बघून आम्ही भाजपमध्ये आलो आहोत. मात्र, पुन्हा विश्वासघात झाल्यास माझे नाव रामदास कदम (Ramdas Kadam) आहे हे लक्षात ठेवा, असा सज्जड दमही त्यांनी भाजप नेतृत्वाला दिला आहे. त्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरही त्यांनी तोफ डागली होती, तर दुसरीकडे शिंदे गटाला जेवढ्या जागा दिल्या जातील, तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एकंदरीत जागावाटपावरून महायुतीमधील तिन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी महायुतीतील सर्वच नेत्यांना टोला लगावला आहे. राजू पाटील म्हणाले, हा विषय त्यांचा आहे. आम्हाला त्यामध्ये पडायची गरज नाही. परंतु, लोकसभा इलेक्शन हा ट्रेलर आहे. विधानसभेला अजून भाई उतरतील. यांच्यातील आणि त्यांच्यात भांडण होणार आहेत. आम्हाला त्यांच्या राजकारणात रस नाही, असेही स्पष्ट केले आहे.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.