Sanjay Kelkar, Devendra Fadanvis, Eknath shinde sarkarnama
ठाणे

Thane Loksabha Constituancy : भाजपचा पुन्हा ठाणे लोकसभेवर दावा; केळकर म्हणाले, संधी दिल्यास लढणार...

सरकारनामा ब्युरो

Thane News : ठाणे लोकसभेच्या उमेदवारीवरून महायुतीत खलबत्ते सुरुच असून ही जागा कोणाकडे जाणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यातच शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून या जागेवर दावे प्रतिदावे सुरु आहेत. अशातच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सांगत, पुन्हा एकदा ठाणे लोकसभेवर दावा केला आहे. तर, कार्यकर्ते मला नक्कीच मदत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात ठाणे लोकसभेचा उमेदवार कोण अशी चर्चा रंगू लागली आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजप दोघांकडून ही या मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे.

त्यातच नुकत्याच भाजपच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाणे हे भाजपसाठी महत्वाचे असल्याचे सूचक विधान केले होते. त्यात पुन्हा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी देखील पक्षाने तिकीट दिल्यास निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.

ठाणे लोकसभा हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघात रामभाऊ कापसे हे भाजपचे खासदार होते. त्यावेळी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी अधिक नगरसेवक असल्याचे गणित मांडले. त्यावेळी शिवसेनेला ही जागा देण्यात आली आणि प्रकाश परांजपे हे तीनदा खासदार झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परंतु आता गणित मांडायचे झाले तर ठाण्यात भाजपचे आमदार आणि नगरसेवकांची संख्या अधिक आहे. असे असले तरी सर्वच गणितावर अवलंबून नसते. पक्षाचे वरिष्ठ नेते अनेक बाबींचा विचार करून निर्णय घेतात. त्यामुळे ही जागा भाजपला मिळाली तर कार्यकर्ता सुखावेल, असेही आमदार संजय केळकर यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT