Shrikant Shinde News : ठाणे लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे लढणार? एकनाथ शिंदे बालेकिल्ल्यासाठी आग्रही

LoksabhaElection2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघ मिळावा म्हणून भाजप आग्रही आहे, तर ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असल्याने ती जागा सोडण्यास शिंदे तयार नाहीत.
shrikant shinde
shrikant shindesarkarnama

Thane Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीत त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे दोनदा विजयी झाले आहेत. त्यामुळे तेच येथून उमेदवार असल्याची शक्यता होती. मात्र, कल्याणचा उमेदवार पहिल्या यादीत जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे श्रीकांत शिंदे हे राजन विचारेंच्या विरोधात ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे.

shrikant shinde
Mahayuti Seat Allocation : महायुतीचं जागावाटप 4 ते 5 जागांवर अडलंय; देवेंद्र फडणवीसांची कबुली

ठाणे लोकसभा मतदारसंघ मिळावा म्हणून भाजप आग्रही आहे, तर ठाणे हा एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) बालेकिल्ला असल्याने ती जागा सोडण्यास शिंदे तयार नाहीत. त्यामुळे या जागेवरचा तिढा अजूनही सुटलेला नाही. ठाणे मतदारसंघ एकनाथ शिंदे यांना मिळाला तरी या जागेवर मोठा उमेदवार शिंदेंकडे नाही, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामुळेच या मतदारसंघातून लढण्यासाठी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे नाव पुढे येत आहे.

कल्याण मतदारसंघामध्ये शिवसेनेचे प्राबल्य प्रथमपासूनच राहिलेले आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील विधानसभा मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाकडून रणनीती आखण्यात येत आहे. कल्याण शहरातील शिवसैनिक हे ठाकरे गटासोबत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या मतदारसंघात धोका पत्करण्यापेक्षा श्रीकांत शिंदे यांना एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून उमेदवारी देण्याच्या चर्चा आहेत.

...तर राजन विचारे विरुद्ध श्रीकांत शिंदे लढत

ठाकरे गटाकडून राजन विचारे यांना ठाणे मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते येथून विद्यमान खासदार आहेत. ठाणे मतदारसंघ आपल्याकडे राहावा, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. महायुतीत ही जागा त्यांना मिळाली तर श्रीकांत शिंदे येथून उमेदवार असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या मतदारसंघात राजन विचारे विरुद्ध श्रीकांत शिंदे असा सामना होईल.

R

shrikant shinde
Dharshiv Loksabha News: महायुतीत 'धाराशिव'ची जागा राष्ट्रवादीला; भाजपच्या पदाधिकाऱ्याची फडणवीसांकडे 'ही' मागणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com