Thane Loksabha sarkarnama
ठाणे

Thane Loksabha Election : प्रचाराचा धुरळा उडविण्यासाठी ठाण्यात नऊ हेलिपॅड; निवडणूक विभागाची परवानगी घ्यावी लागणार...

Pankaj Rodekar

Thane News : निवडणुकीच्या कालावधीत प्रचारासाठी येणाऱ्या दिग्गज नेतेमंडळींचा वेळ आणि त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करताना होणारी दगदग लक्षात घेत, हेलिकॉप्टरच्या वापरावा विशेष यावेळी भर दिला जाण्याची शक्यता जास्तच आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील एक- दोन नव्हेतर चक्क नऊ हेलिपॅड सज्ज ठेवण्यात आले आहे. पण, आकाश भ्रमण सफारीसाठी निवडणूक विभागाने परवानगीचा फास ओढून धरला आहे.

हेलिकॉप्टर उड्डाण व उतरविण्यापुर्वी निवडणुक विभागाची परवानगी घ्या, असे म्हटले आहे. या परवानगीसाठी खास कक्षाचे स्थापन करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक विभागाने दिली. लोकसभा निवडणुकीच्या पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा तिढा सुटलेला नाही. ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा क्षेत्र मोडतात. ठाणे जिल्ह्याला राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री पद लाभलेले आहे.

तर, केंद्रीय राज्यमंत्री देखील याच जिल्ह्यातील आहे. त्यामुळे जिल्ह्याला राजकीय दृष्ट्या महत्व प्राप्त झाले आहे. एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तर, दुसरीकडे ठाणे लोकसभा मतदार संघासाठी महायुतीला उमेदवारच भेटत नसल्याने उमेदवारी जाहीर झाली नाही. तर, कल्याण आणि भिवंडी लोकसभेतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

एकंदरीत तिन्ही ठिकाणी उमेदवारांनी प्रचाराचा श्री गणेशा केला असून बैठका, गाठीभेटी, चौक सभा आणि मेळावे घेण्यास सुरुवात देखील केली आहे. त्या जसाजसा प्रचाराची रणधुमाळी वाढेल तसतसे जेष्ठ नेत्यांचे प्रचार सभांसाठी दौरे देखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी नेत्यांना एकाच वेळी अनेक ठिकाणी जावे लागणार आहे. त्यातच उन्हाळा असल्याने दगदग मोठी होणार आहे.

शिवाय वाढत्या वाहनांमुळे कोंडीत अडकण्याची भीती आहे. गाडीतून प्रवासाला अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन यंदा हेलिकॉप्टरचा वापर देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील एका शासकीय हेलिपॅडसह ८ खासगी हेलिपॅड सज्ज ठेवण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लागू असलेल्या आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी निवडणूक काळात या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उड्डाण आणि उतरविण्यासाठी निवडणूक विभागाची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. तसेच ४८ तास आधी ते सात दिवसा आधी त्याची परवानगी घ्यावी लागणार असून त्यासाठी कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT