State Govt : राज्य सरकारने दिली 'या' निवडणुकांना स्थगिती; सहकार पणन विभागाने काढले आदेश...

Co-operative Marketing Department passed orders : 31 मेपर्यंत ही स्थगिती देण्यात आली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका असलेल्या संस्था यातून वगळण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.
State Govt
State GovtSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. यामध्ये राज्यात नवीन आर्थिक वर्षात निवडणुकीस पात्र ठरलेल्या सुमारे 38 हजार 740 सहकारी संस्थांचा समावेश आहे. त्यापैकी 10 हजार 783 संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असतानाच हा निर्णय झाला आहे.

31 मेपर्यंत ही स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत सहकार पणन विभागाने आदेश काढले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका असलेल्या संस्था यातून वगळण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील सुमारे 27 हजार सहकारी संस्थांच्या (Co-operative Societies) निवडणुका राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून येत्या वर्षभरात करण्याचे आदेश देण्यात आले होते. राज्यात 31 डिसेंबर 2023 अखेर निवडणुकीसाठी पात्र असलेल्या 93 हजार 342 सहकारी संस्थांपैकी 50 हजार 238 सहकारी संस्थांची निवडणूक (Loksabha Election) पूर्ण झाली आहे.

State Govt
Maharashtra Assembly News : जब्बारांनी रिल्स लाइफमधून जपलेली 'डिग्निटी' सत्ताधाऱ्यांनी रिअलमध्ये धुळीस मिळवली!

उर्वरित सहकारी संस्थांपैकी 10 हजार 783 सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होती, तर 20 हजार 130 सहकारी संस्थांच्या निवडणुका मात्र प्रलंबित आहेत. तसेच यंदाच्या 2024 या वर्षात 7 हजार 827 सहकारी संस्था निवडणुकांसाठी पात्र ठरत असल्याने या सर्व 38 हजार 740 सहकारी संस्थांची निवडणूक सहकार विभागाला घ्यावी लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असल्याने सहकार विभागाने उच्च न्यायालयाने निवडणुकांचे आदेश दिलेल्या निवडणुका वगळून येत्या 31 मे 2024 पर्यंत सरसकट सगळ्या संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. मात्र, सर्वोच्च व उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या सहकारी संस्था वगळून राज्यातील अन्य सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या तारखेपासून ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर स्थगित करून 31 मेपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

R

State Govt
Shirur Loksabha Constituency : अजितदादांचा ‘दुसरा हट्ट’ही वळसे पाटील पूर्ण करणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com