Akola Vidhansabha By election sarkarnama
अकोला

Akola News : अकोला पश्चिम पोटनिवडणूक; भाजपमधून गोवर्धन शर्मांच्या मुलासह १५ इच्छुक

सरकारनांमा ब्यूरो

Akola News : अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारीवर दिवंगत भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे. दिवंगत आमदार गोवर्धन शर्मांचा मोठा मुलगा कृष्णा शर्मा यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. या निवडणुकीसाठी तब्बल १५ उमेदवार भाजपकडून इच्छुक आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते हे पाहणं महत्त्वाचे असेल.

सध्या लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीसोबतच अकोला पश्चिम विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. येत्या २७ एप्रिलला ही निवडणूक होणार आहे. आजपर्यंत या मतदारसंघातून १९९५ ते २०२३ असे सलग सहा वेळा गोवर्धन शर्मा यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. आता होणाऱ्या या पोटनिवडणुकीत भाजपकडून तब्बल १५ जण उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे. गोवर्धन शर्मांनी अकोला पश्चिम मतदारसंघाचं सहा पंचवार्षिक प्रतिनिधित्व केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून तब्बल १५ जण इच्छुक असून, नुकत्याच पक्षाचे निरीक्षक डॉ. उपेंद्र कोठीकर आणि माजी आमदार अनिल सोलेंनी या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. या वेळी दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा कुटुंबातीलच कृष्णा शर्मा यांनी भाजपच्या वरिष्ठांकडे मुलाखतीसाठी अर्ज दिला आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार का, याची उत्सुकता आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या पोटी-निवडणुकीसाठी शर्मा कुटुंबातीलच उमेदवार दिला जावा, असा आग्रह महायुतीतील मित्रपक्षांकडे धरला आहे. त्यामुळे भाजपकडून अकोला पश्चिम मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची माळ कोणाच्या गळ्यात पड़ते हे पाहण महत्त्वाचे असणार आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT