Akola Bye-election : अकोला पश्चिम विधानसभा निवडणूक घोषित करण्यात आली आहे. ही पोटनिवडणूक आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे घेण्यात येत आहे. ही निवडणूक लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. निवडणूक शुक्रवार 26 एप्रिल रोजी होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत अकोला पश्चिमची पोटनिवडणूक होणार असून, याचा निकाल 4 जूनला लागणार आहे. पोटनिवडणुकीचा निकाल इतक्या उशिराने लागण्यामागचे कारण निवडणूक आयोगाने निश्चित करण्याची गरज आहे. यामुळे निवडलेल्या आमदाराला जास्त कार्यकाळ काम करता येणार नाही, अशी ओरड राजकीय नेत्यांची आहे.
लोकसभेबरोबरच महाराष्ट्रातील पोटनिवडणूक आयोगाकडून जाहीर केली आहे. देशातील लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्यानुसार यंदाची लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत पार पडणार आहे. १९ एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक सुरू होणार असून, ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे, तर महाराष्ट्रात ५ टप्प्यांत निवडणूक होणार असल्याचंही या वेळी राजीव कुमार यांनी सांगितलं. या वेळी त्यांनी विविध राज्यातील पोट निवडणुका कधी होणार, याची माहितीदेखील दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विविध राज्यांतील पोटनिवडणुका होणं बाकी असल्याचं सांगितलं. या वेळी त्यांनी महाराष्ट्र, बिहार, गुजरात, हरियाणा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू आणि झारखंड या ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुका आत्ता जाहीर केल्या. राज्यात पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या मृत्यूमुळे ही पोटनिवडणूक घेतली जाणार असल्याचं या वेळी जाहीर करण्यात आलं. पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी सुरू होणार आहे, तर 1 जून रोजी शेवटचा टप्पा पार पडणार आहे. 4 जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे, अशी माहिती आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.