Dhananjay Munde, Manoj Jarange Patil, Pankaja Mumnde
Dhananjay Munde, Manoj Jarange Patil, Pankaja Mumnde sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

Manoj Jarange Patil News : धमक्या देऊ नका; माझे रक्षण करायला सहा कोटी मराठा खंबीर...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : धनंजय मुंडे यांना मी प्रामाणिक समजायचो. त्यांनी कधी जातीयवाद केला नाही, मी त्यांच अनुकरण इतरांनीही करावे, असं नेहमी सांगायचो. पण, गेल्या पाच-सहा दिवसापासून त्याचं काही तरी बिघडलयं. दिवगंत गोपीनाथ मुंडेसाहेबांनी कधी जातीयवाद केला नव्हता, पण मराठा समाजाचे एवढे उपकार असताना धनंजय मुंडे समाजाविरोधात पोस्ट टाकायला लावून जातीयवाद करत आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी संभाजीनगरात केला.

मला काही फरक पडत नाही, येऊ देणार नाही अशा धमक्या दिल्या जात आहेत. पण, माझा सहा कोटी मराठा समाज माझे संरक्षण करण्यासाठी खंबीर आहेत, असा इशाराही जरांगे यांनी दिला. बीड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार आणि प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मुंडे बहिण-भावातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.

विशेषतः बीड जिल्ह्यात येऊ देणार नाही, अशा धमक्यांचे फोन जरांगे पाटील यांना आल्यापासून या विषयाची चर्चा राज्यभरात होताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रात लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार आज संपला. 20 मे रोजी राज्यातील शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला भावनिक होऊन कुणासोबत जाऊ नका, असे आवाहन केले.

नारायण गड येथे 8 जून रोजी होणारी सभा सुविधांचा अभाव आणि पाण्याच्या टंचाईमुळे निर्माण झालेली दुष्काळाची परिस्थिती पाहता पुढे ढकलण्यात आल्याचे जरांगे म्हणाले. मराठ्यांनी कधी जातीयवाद केला नाही, पण काही लोक तो मुद्दा करतायेत. त्यांची वेळ निघून गेली म्हणून ते गुरगुर करतायेत. शांत राहून महिनाभर लक्ष्य ठेवा, असा सूचक इशारा करतांनाच वेळ आली तर स्वसंरक्षण करा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

पदर पसरते, निवडून द्या असे आवाहन केले, तुम्ही येताल नाहीतर पडताल, असा टोलाही जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांना नाव न घेता लगावला. धनंजय मुंडे Dhananjay Munde यांना मी प्रामाणिक, जातीयवाद न करणारा समजत होतो. इतरांनी याबाबतीत त्यांच्या आदर्श घ्यावा, अनुकरण करावं, असं मी म्हणायचो. परंतु मागील दोनचार दिवसात तेही पुढे गेले. पोस्ट टाकायला लावत आहेत.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

गोपीनाथ मुंडेंनी कधी एवढा जातीयवाद केला नाही. ते काय बोलतात ते लिहून ठेवा, असे आवाहन करतांना जरांगे यांनी धनंजय मुंडे यांचे थेट नाव घेत टीका केली. चार जूनला उपोषण करण्यावर आपण ठाम आहोत, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT