Manoj Jarange Patil News : लोकसभेच्या निकालादिवशीच जरांगे उपसणार पुन्हा आंदोलनाचं हत्यार

Manoj Jarange Patil On Pm Narendra Modi : "पंतप्रधान मोदी कधीच एवढ्यावेळा महाराष्ट्रात आले नव्हते. आता...", असं निशाणाही जरांगे-पाटलांनी साधला आहे.
manoj jarange patil
manoj jarange patil sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News, 14 May : मराठा आरक्षणासाठी ( Maratha Reservation ) लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. 4 जूनपासून जरांगे-पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसणार आहेत. सगेसोयरेच्या मागणीसाठी जरांगे-पाटील पुन्हा एकदा आंदोलनाला बसणार असल्याचं बोललं जात आहे. त्यासह 8 जूनला नारायण गडावर जरांगे-पाटील यांची सभा होणार आहे.

4 जूनला 9 वाजता आंतरवाली-सराटी येथे आमरण उपोषणाला सुरूवात होईल. त्यासह 8 जूनला बीडमधील नारायण गड येथे सभा होणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा ( Lok Sabha Election 2024 ) निकाल लागणार आहे. त्याचदिवशी जरांगे-पाटील उपोषणाला बसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे-पाटील म्हणाले, "मुहूर्त पाहून 4 जूनला आंदोलनाला बसत नाही. स्वत:च्या लेकरांना न्याय मिळवून देण्याबाबत आम्हाला आनंद आहे. पण, सरकारनं 10 टक्के दिलेलं मराठा आरक्षण पोलिसी भरतीत लागू झालं नाही. त्यामुळे भाजपमधील गोरगरीब मराठा आणि सामान्य जनतेच्या लेकरांच्या वाटोळं झालं आहे."

"मी निवडणुकीच्या प्रक्रियेत नाहीच आहे. कोणाचा प्रचारही केला नाही किंवा कोणाला निवडून आणा म्हटलं नाही. महायुती आणि महाविकास आघाडीला आमचा पाठिंबा नव्हता. फक्त पाडा, असं आवाहन समाजाला केलं होतं. कारण, त्यात खूप मोठी ताकद आहे," असं जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे.

manoj jarange patil
Manoj Jarange News : जरांगेंच्या रडारवर चंद्रकांतदादा पाटील, आता बघतोच कसा आमदार होतोय...

"पंतप्रधान मोदी कधीच एवढ्यावेळा महाराष्ट्रात आले नव्हते. आता गोधड्या घेऊन आले असून महाराष्ट्रातच झोपत आहेत. याला मराठ्यांची भीती म्हणतात... पंतप्रधान मोदी कधीच माध्यमांशी संवाद साधत नाहीत. आता एक-एक तास संबोधन करत आहे. आजपर्यंत मोदींनी भाजप सोडून कधीच दुसऱ्या पक्षाचा प्रचार केला नव्हता. पण, आता कुणाचाही प्रचार करत आहेत. भाजपच्या राज्यातील काही नेत्यांमुळे पंतप्रधानांवर ही वेळ आली आहे. भाजपच्या नेत्यांना मराठे, दलित, मुस्लिम आणि बाराबलुतेदारांविषयी प्रचंड द्वेष आहे. धनगर बांधवांचाही कार्यक्रम केला आहे," असा आरोप जरांगे-पाटलांनी भाजपावर केला आहे.

manoj jarange patil
Manoj Jarange : लाठीचार्जचे आदेश देणाऱ्याचं नाव घ्या, मग...; मनोज जरांगेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना ओपन चॅलेंज

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com