Ekanth Shinde, Devendra Fadanvis, Sambhajiraje Chhatrapati
Ekanth Shinde, Devendra Fadanvis, Sambhajiraje Chhatrapati sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

chhatrapati Sambhajiraje : तर स्वराज्य संघटना सरकार विरोधात उभी राहणार.... संभाजीराजे

Umesh Bambare-Patil

संभाजीनगर : शेतकरी, कामगार व कष्टकऱ्यांवर अन्याय होत असेल तर त्यांच्या बाजूने लढा उभारण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना झालेली आहे. सध्याच्या सरकारकडून वंचितांचे प्रश्न सुटत नसतील तर या सरकारच्या विरोधात उभे राहण्यास आम्ही कमी पडणार नाही, असा इशारा कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी शिंदे, फडणवीस सरकारला दिला आहे.

संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्वराज्य संघटनेच्या स्थापने मागची भूमिका विषद केली. ते म्हणाले, पाच सहा वर्षापूर्वी स्वराज्य संघटना स्थापन करण्याचा आमचा विचार होता. पण मी पाच ते दहा संघटनांसोबत काम करत करताना त्यांना दुखवणे योग्य होणार नाही. म्हणून या सर्वांना करून लढा उभा करू शकतो.

सरकार त्या तोडीने काम करत नसेल. शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांवर अन्याय न्याय होत असेल तर त्यांच्या बाजूने लढा उभा करण्यासाठी ही संघटना स्थापन झाली आहे. सरकारकडून प्रश्न सुटत नसतील तर त्यांच्या विरोधात उभे राहण्यासही आम्ही कमी पडणार नाहीत. सामाजिक संदर्भातील लोकांचे प्रश्न सोडविण्यात ते कमी पडले तर स्वराज्य संघटना या सामान्य माणसाच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणार आहे.

सरकार चुकीचे काम करत असेल तर स्वराज्य संघटना काहीही पाहणार नाही, अन्यायाविरोधात लढा उभा करणार आहे. छत्रपतींच्या घराण्यात जन्माला येऊन अमरण उपोषण करणे ही छोटी गोष्ट नाही. सरकारच्या विरोधात जोमाने उभे राहणार आहे. सध्या सुरू असून पक्ष फोडणे, पळवापळवी होत आहे, जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुमची काय भूमिका असेल.

या प्रश्नावर संभाजीराजे म्हणाले, कोण पक्षात उडी मारतंय, तर कोणी पूर्वीच्या नेत्यांविरोधात उलट सुलट स्टेटमेंट करतंय. यातून स्वराज्य संघटना उभी राहिली आहे. आमची ही ताकद प्रस्थापितांना द्यायची नाही. तर विस्थापितांना ताकद देण्याचे काम संघटनेचे राहणार आहे. त्यांच्यात आणि आमच्या संघटनेत हाच मुलभूत फरक असेल. शिवाजी महाराजांनी मावळे, शेतकऱ्यांना ताकद दिली. आम्ही त्याप्रमाणे विस्थापितांना मागे उभे राहून ताकद देणार आहोत. कोण किती उड्या मारतात त्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT