Tejasvi Surya
Tejasvi Surya sarkarnama
देश

Tejasvi Surya News : भाजपचा फायरब्रँड नेता अडचणीत, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Roshan More

Loksabha Election : कर्नाटकामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये टक्कर आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज (शुक्रवारी) कर्नाटकामध्ये झाले. बंगळुरू लोकसभा मतदासंघातून भाजपकडून तेजस्वी सूर्या उमेदवार आहेत, तर काँग्रेसकडून Congress कर्नाटक सरकारचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांची मुलगी सौम्या रेड्डी उमेदवार आहेत. गुरुवारी (ता.25) धर्माच्या नावाने मत मागणाऱ्या तेजस्वी सूर्या यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे.

तेजस्वी सूर्या Tejasvi Surya यांनी आपल्या धर्माच्या नावाने मत मागणा व्हिडिओ प्रसारित केला होता. याची दखल घेत निवडणूक आयोगाने सूर्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत गुन्हा दाखल केला. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आपल्या ट्विटरवरून माहिती दिली की, ट्विटरवर एक व्हिडिओ प्रसारती करण्यासाठी तसेच धर्माच्या आधारावर मत मागण्यासाठी 25 एप्रिलला जयनगर पोलिस Police ठाण्यात बंगळुरू दक्षिणचे उमेदवार तेजस्वी सूर्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तेजस्वी सूर्या याने मतदानाचे आवाहन करताना भाजपचे 80 टक्के समर्थक आहेत. मात्र, 20 टक्केदेखील मतदानासाठी बाहेर पडत नाही. मात्र, काँग्रेसचे समर्थक 20 टक्के आहे. मात्र, मतदानाला 80 टक्के बाहेर पडतात. तुमचे एक एक मत महत्त्वाचे आहे. कृपया मतदानाला बाहेर पडा. तु्म्ही बाहेर नाही पडला तर काँग्रेसचे 20 टक्के नक्की मतदानाला बाहेर पडणार, असे म्हटले होते.

आज (शुक्रवारी) दुसऱ्या टप्प्यात बंगळुरू दक्षिणच्या जागेवर मतदान झाले. तेजस्वी सूर्या आणि सौम्या रेड्डी यांची या जागेवर लढत होत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधून काँग्रेसचा अवघा एक उमेदवार जिंकला होता. यंदा भाजप आणि जेडीएस यांच्यामध्ये युती आहे. त्यामुळे ते एकत्रीत पणे या निवडणुकीला सामोरे जात आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT