CJP Abhijeet Dipke Sarkarnama
देश

Abhijeet Dipke Assaulted : CJPच्या अभिजीत दिपकेंना मारहाण! आंदोलनादरम्यान भाषण करत असताना झाला हल्ला

Abhijeet Dipke Assaulted : अखिल भारतीय स्तरावरील विविध परीक्षांमधील गोंधळाची जबाबदारी स्विकारुन राजीनाम्याच्या मागणीसाठी अभिजीत दिपके सध्या आपल्या कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीनं देशभरात आंदोलन करत आहे.

Amit Ujagare

Abhijeet Dipke Assaulted : अखिल भारतीय स्तरावरील विविध परीक्षांमधील गोंधळाची जबाबदारी स्विकारुन राजीनाम्याच्या मागणीसाठी अभिजीत दिपके सध्या आपल्या कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीनं देशभरात आंदोलन करत आहे. आज राजस्थानातील जयपूर इथं शहीद स्मारक परिसरात त्यांचं आंदोलन सुरु असताना अचानक काही तरुणांनी त्याच्याजवळ येत हल्ला चढवला. यानंतर एकच गोंधळ माजला त्यानंतर पोलिसांनी मारेकऱ्यांना ताब्यात घेतलं.

अभिजीत दिपके हे सध्या भारतातील विविध ठिकाणी आंदोलनं करत आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी देशभरातील तरुणांना एकत्र येण्याचं आणि रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा आवाहन केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज ते राजस्थानची राजधानी जयपूर इथं निषेध आंदोलन सुरु होतं. या आंदोलनाना मोठ्या प्रमाणावर तरुणांनी गर्दी केली होती, यावेळी दिपके आंदोलनस्थळी दाखल होताच तरुणांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं आणि जल्लोष सुरु केला. त्याचवेळी गर्दीचा फायदा घेऊन तरुणांच्या एका गटानं थेट अभिजीत दिपकेंना मारहाण करायला सुरुवात केली.

या गटानं दिपकेंना मारहाण केल्यानंतर सीजेपीच्या काही समर्थक तरुणांनी मारहाण करणाऱ्या तरुणांना बाहेर घेऊन जात बेदम मारहाण केली. यावेळी दिपकेंनी आपल्या समर्थकांना थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांना मारु नका सोडून द्या असं आवाहन ते करत होते, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी तिथं उपस्थित असलेल्या पोलिसांनीही धाव घेत त्या तरुणाला ताब्यात घेतलं. त्यानंतर काही काळ या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

अभिजीत दिपकेंना यापूर्वीच काही तरुणांनी जीवे मारण्याची धमकीही दिली होती. धमकी देणाऱ्यानं सोशल मीडियावर धमकी देणारा व्हिडिओ आपल्या चेहऱ्यासह पोस्ट केला होता. जर तु भाजपविरोधात बोलणार असशील तर तुला आमच्या पद्धतीनं कारवाई करु अशा पद्धतीची विधानं या व्हिडिओतून करण्यात आली होती. याची स्वतः अभिजीत दिपकेनं सोशल मीडियावरुन माहिती दिली होती. पण संबंधित धमकी देणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नव्हती. त्याचीच परिणीती आज अभिजीत दिपकेंवर हल्ला झाल्यात झाली आहे.

तिसरं आंदोलन

अभिजीत दिपके आणि त्याच्या कॉक्रोच जनता पार्टी या संघटनेनं पहिल्यांदा दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन केलं. या आंदोलनाला तरुणांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला होता. त्यानंतर दुसरं आंदोलन हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात आलं, या ठिकाणीही तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आज तिसरं आंदोलन हे जयपूरमध्ये करण्यात आलं, या ठिकाणीही तरुणांनी बरीच गर्दी केली होती. या तिन्ही आंदोलनांदरम्यान अभिजीत दिपकेनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT