

Sushma Andhare: तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांचा गट एका अशा पक्षात विलिन झाला आहे जो पक्ष बहुतेक जणांना माहितीच नाही. हा गट भाजपत विलिन होईल असं वाटत असताना NCPI नावाच्या पक्षात विलिन झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यामुळं एक वेगळ्याच प्रकारचं राजकारण आता सुरु होतंय की काय असंही बोललं जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं आहे.
अंधारे यांनी यावरुन थेट भाजपवर निशाणा साधला असून तृणमूल काँग्रेसच्या खासदारांच्या गटाच्या या कृतीमुळं भाजपनं स्पष्ट संदेश दिला आहे की, एकतर आम्ही तुमचा विषय व्यवस्थित मार्गी लावू किंवा तुम्हाला गोळ्या घालू. संसदीय लोकशाही मार्गानं सत्ता हस्तगत करता येत नसल्यानं भाजपनं आता हा नवा उद्योग सुरु केला असल्याचंही अंधारे यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करताना अंधारे म्हणतात की, "तीच पद्धत... तीच स्टाईल! आधी पक्षातले अर्धे अधिक लोक बाजूला करायचे.... मग त्यांचा एक स्वतंत्र गट स्थापन करायचा.... मग त्यांनीच आम्ही ओरिजनल आहोत असा दावा करायचा... मग त्यातल्याच एकाने नेता व्हायचं आणि भाजपला पाठिंबा द्यायचा... आधी शिवसेना मग राष्ट्रवादी आता तृणमूल काँग्रेस उद्या कदाचित पंजाबमध्ये आप सुद्धा...पक्षनेतृत्वावर बाहेर पडणाऱ्याने ज्यांना जशी स्क्रिप्ट दिली तशा टीका करायच्या स्क्रिप्ट वाचायच्या.... शिवसेनेसाठी हिंदुत्वाचा मुद्दा. राष्ट्रवादीसाठी नेतृत्वाचा मुद्दा... तृणमूल काँग्रेससाठी IT सेलला अजून स्क्रिप्ट मिळायची बाकी असावी," असे अनेक आरोप सुषमा अंधारे यांनी केले आहेत.
पण या सगळ्यांची गोळा बेरीज काय? तर "भाजप निवडणुकीच्या मार्गाने विशेषतः निष्पक्ष आणि संसदीय लोकशाही मार्गाने या देशाची सत्ता हस्तगत करू शकत नाही. म्हणूनच ही फोडाफोड करावी लागतेय. यातून भाजपने स्पष्ट संदेश दिलाय की, Either we Will set you or shoot you.. त्यामुळं आता विरोधकांना ठरवून घ्यायच आहे. स्वतःला, आपल्या पोराबाळांना, लेकी सुनांना सेट करायचं की संसदीय लोकशाही वाचवण्यासाठी शूट करून घ्यायची तयारी ठेवायची...? Choice is yours...!!!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.