Iran-USA War: इराण-अमेरिका युद्ध थांबलं, लगेचच आली खूशखबर! जगभरातील नागरिकांना दिलासा, भारताला होणार मोठा फायदा

Iran USA War Ends: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, अमेरिका आणि इराण दरम्यान शांतता करार झाला आहे.
Iran USA War
Iran USA War Sarkarnama
Published on
Updated on

Iran-USA War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, अमेरिका आणि इराण दरम्यान शांतता करार झाला आहे. या करारानंतर सोमवारी कच्च्या तेलांच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. त्यामुळं जगभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच भारताला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पण तेलाचे दर नेमके किती कमी झालेत? सविस्तर जाणून घेऊयात.

Iran USA War
TMC merger in NCPI : 'खांडू' पॅटर्नने ममता बॅनर्जींना धोबीपछाड : 10 वर्षापूर्वीच लिहिली होती पक्षांतराची 'अरुणाचल प्रदेश' स्क्रिप्ट

ब्रेंट क्रूड ३.९ टक्क्यांची घट होऊन ८४ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला आहे. त्यातच डब्ल्यूटीआय क्रूड ४.८ टक्क्यांनी घसरुन ८१ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर भारतात अद्याप तेलाच्या किंमती कमी झालेल्या नाहीत. पण इतर देशांमध्ये ट्रम्प यांनी युद्ध संपल्याची घोषणा केल्यानंतर आणि हॉर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यात आल्याची घोषणा केली त्यानंतर लगेचच तेलाचे दर कमी झाले आहेत.

Iran USA War
SC Reservation Sub Classification : आरक्षणातील उपवर्गीकरणावरून नवा वाद! मंत्री संजय शिरसाटांचा मोठा दावा; ‘या विषयाला जाणीवपूर्वक ट्विस्ट दिला जातोय’

ट्रम्प यांनी नेमकी काय केली घोषणा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली. यात ते म्हणतात, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण या देशासोबत आम्ही शांतता करार पूर्ण केला आहे. यानंतर आता स्ट्रेट ऑफ हार्मुझला कोणत्याही मोबदल्याशिवाय सुरु करण्याची परवानगी देण्यात येत आहे. त्याचबरोबर या भागातील अमेरिकन नौदलाची नाकेबंदी तातडीनं हटवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळं आता हार्मुजमध्ये अडकून पडलेली जगभरातील जहाज आपले इंजिन सुरु करु शकतात. त्यानंतर तेलाची वाहतूक पुन्हा सुरु होईल. यामध्ये मोठी गोष्ट ही आहे की, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावतीनं ही घोषणा अशावेळी करण्यात आली आहे जेव्हा व्हाईट हाऊसवर त्यांच्या ८० व्या वाढदिवसाची तयारी सुरु आहे.

Iran USA War
NCPI news : तृणमूलचे 20 बंडखोर खासदार अडचणीत? विलीन झालेल्या पक्षातच पडली वादाची ठिणगी, संस्थापक सदस्याने घेतला आक्षेप

दरम्यान, इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये झालेल्या शांतता कराराचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. बाजार सुरु झाल्यानंतर वधारला, यामध्ये सेंसेक्स ११८९.६१ अंशांनी म्हणजेच १.५८ टक्क्यांच्या वाढीसह ७६,७१७ अंशांवर सुरु झाला. तर निफ्टीमध्ये देखील १.५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आणि तो २३,९७९ अंशांवर सुरु झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com